Param Bir Singh in Mumbai परमबीर सिंह मुंबईत क्राइम ब्रँच युनिट ११ समोर हजर

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Nov 25, 2021 | 16:24 IST

Extortion case: Former police commissioner Param Bir Singh appears before Mumbai Crime Branch मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह आज (गुरुवार २५ नोव्हेंबर २०२१) मुंबईत दाखल झाले. सर्वोच्च न्यायालयाने अटकेपासून दोन आठवड्यांचे संरक्षण दिल्यानंतर मुंबईत आलेल्या परमबीर सिंह यांनी मुंबई पोलिसांच्या क्राइम ब्रँच युनिट ११ समोर त्यांचे 'स्टेटमेंट' नोंदवले.

Extortion case: Former police commissioner Param Bir Singh appears before Mumbai Crime Branch
परमबीर सिंह मुंबईत क्राइम ब्रँच युनिट ११ समोर हजर 
थोडं पण कामाचं
  • परमबीर सिंह मुंबईत क्राइम ब्रँच युनिट ११ समोर हजर
  • क्राइम ब्रँचने गोरेगाव पोलिसांनी नोंदवलेल्या खंडणी वसुलीच्या प्रकरणात परमबीर सिंह यांचे 'स्टेटमेंट' नोंदवून घेतले
  • परमबीर सिंह २०० पेक्षा जास्त दिवसांपासून गायब होते

Extortion case: Former police commissioner Param Bir Singh appears before Mumbai Crime Branch मुंबईः मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह आज (गुरुवार २५ नोव्हेंबर २०२१) मुंबईत दाखल झाले. सर्वोच्च न्यायालयाने अटकेपासून दोन आठवड्यांचे संरक्षण दिल्यानंतर मुंबईत आलेल्या परमबीर सिंह यांनी मुंबई पोलिसांच्या क्राइम ब्रँच युनिट ११ समोर त्यांचे 'स्टेटमेंट' नोंदवले. क्राइम ब्रँचने गोरेगाव पोलिसांनी नोंदवलेल्या खंडणी वसुलीच्या प्रकरणात परमबीर सिंह यांचे 'स्टेटमेंट' नोंदवून घेतले.

याआधी सचिन वाझे याला अटक झाल्यानंतर काही दिवसांनी परमबीर सिंह यांची राज्याच्या 'डीजी होमगार्ड' या पदावर बढती आणि बदली झाली. बदली झाल्यानंतर रजेवर गेलेले परमबीर सिंह २०० पेक्षा जास्त दिवसांपासून गायब होते. अखेर ते मुंबईत दाखल झाले. मुंबईत दाखल होण्याच्या आदल्या दिवशी परमबीर सिंह यांनी चंदिगडमध्ये आहे आणि लवकरच मुंबईत येणार आहे, असे जाहीर केले होते. 

सर्वोच्च न्यायालयात वकिलाच्यावतीने स्वतःची बाजू मांडून अटकेपासून संरक्षण मिळवून परमबीर सिंह मुंबईत दाखल झाले. याआधी त्यांनी महाराष्ट्रात जिवाला धोका आहे, असे सर्वोच्च न्यायालयात वकिलामार्फत सांगितले. स्वतःची बाजू मांडताना त्यांनी पोलीस महासंचालक संजय पांडे यांच्यासोबतच्या व्हॉट्सअॅप चॅटचे स्क्रीनशॉट पुरावे म्हणून सादर केले होते. सर्वोच्च न्यायालयाने अटकेपासून संरक्षण देऊन चौकशीला सहकार्य करण्याचे आदेश दिल्यानंतर परमबीर सिंह मुंबईत दाखल झाले. 

मुंबई पोलिसांनी पाच प्रकरणांमध्ये परमबीर यांच्यावर खंडणी वसुलीचा आरोप केला आहे. तर महाराष्ट्राचे तत्कालीन गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अनिल देशमुख यांनीच खंडणी वसुलीचे आदेश दिल्याचा आरोप परमबीर यांनी पत्राद्वारे काही महिन्यांपूर्वी केला. सचिन वाझे याच्याकडे १०० कोटींच्या खंडणी वसुलीचे टार्गेट देशमुखांनीच दिल्याचा आरोप परमबीर यांनी केला आहे. 

सध्या अनिल देशमुख न्यायालयीन कोठडीत तर सचिन वाझे मुंबई पोलिसांच्या कोठडीत आहे. परमबीर सिंह मुंबईत दाखल झाले आहेत. यामुळे खंडणी प्रकरणात आणखी नवे गौप्यस्फोट होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी