Kirit Somaiya : रायगड : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कुटुंबियांच्या मुरुड तालुक्यातील कोर्लई येथील 19 बंगले प्रकरणात फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी मागणी भाजप नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केली आहे. आज यासंदर्भात सोमय्या यांनी रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यानंतर सोमय्या यांनी पत्रकारांशी संवाद साधला. (file case against ex cm and shivsena leader uddhav thackeray demand bjp leader kirit somaiya)
उद्धव ठाकरे यांनी पदाचा व अधिकारांचा गैरवापर करीत सरकारी नोंदी व दस्त ऐवजांमध्ये फेरफार केल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे. तसेच याप्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी करत आपण लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेणार असल्याचे सोमय्या यांनी सांगितले. तसेच झालेल्या चर्चेदरम्यान या प्रकरणात गैरप्रकार झाल्याचे सीईओ किरण पाटील यांनी मान्य केल्याचा दावाही सोमय्या यांनी केलाय.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.