परमबीर सिंग यांचे खळबळजनक पत्र; 'गृहमंत्र्यांकडून महिन्याला १०० कोटींची मागणी', अनिल देशमुखांवर गंभीर आरोप

Param Bir Singh writes to CM alleging that HM Anil Deshmukh: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना एक पत्र लिहून गृहमंत्र्यांवर गंभीर आरोप केला आहे. 

Former Mumbai CP Param Bir Singh alleges that Maharashtra HM Anil Deshmukh asked Sachin Vaze to collect Rs 100 cr every month
परमबीर सिंग यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र; 'गृहमंत्र्यांकडून महिन्याला १०० कोटींची मागणी', अनिल देशमुखांवर गंभीर आरोप  |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र 
  • पत्रात गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर परमबीर सिंग यांचा गंभीर आरोप
  • 'दर महिन्याला सचिन वाझे यांच्याकडून १०० कोटी रुपयांची जमा करण्याचे होते आदेश'

मुंबई : अँटिलिया जवळ स्कॉर्पिओत आढळलेल्या स्फोटकांच्या प्रकरणात सचिन वाझे यांना अटक झाल्यानंतर राज्य सरकारने मुंबईचे आयुक्त परमबीर सिंग यांची बदली केली. मात्र, आता परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहून गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. परमबीर सिंग यांनी लिहिलेल्या या पत्रामुळे एकच खळबळ उडाली आहे. (Former Mumbai CP Param Bir Singh alleges that Maharashtra HM Anil Deshmukh asked Sachin Vaze to collect Rs 100 cr every month)

आपल्या पत्रात परमबीर सिंग यांनी म्हटलं आहे की, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांच्याकडे दर महिन्याला १०० कोटी वसुलीची मागणी केली असल्याचा दावा पत्रात करण्यात आला आहे. परमबीर सिंग यांनी आपल्या पत्रात म्हटलं, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी वसुलीची जबाबदारी सचिन वाझे यांना देण्यात आली होती. सचिन वाझे यांना बार, रेस्टॉरंट आणि इतर आस्थापनांमधून दर महिन्याला १०० कोटी रुपये वसुल करण्यास सांगितले होते. 

परमबीर सिंग यांनी आपल्या पत्रात म्हटलं, "सचिन वाझे यांना गृहमंत्री अनिल देशमुख यांनी त्यांच्या सरकारी बंगल्यावर अनेकदा बोलवलं. यावेळी गृहमंत्र्यांनी सचिन वाझे यांना दर महिन्याला १०० कोटी रुपये जमा करण्याचं टार्गेट दिलं होतं. हे टार्गेट पूर्ण करण्यासाठी जवळपास १ हाजर ७५० बार, रेस्टॉरंट आणि मुंबईतील इतर काही बाबींचा समावेश होता. ज्यातील प्रत्येकाकडून २ ते ३ लाख रुपये जमा करण्याचं म्हटलं होतं. म्हणजे महिन्याला ४० ते ५० कोटी रुपये होतील. तर उर्वरित पैसे इतर बाबीतून मिळवता येतील." असा दावा परमबीर सिंग यांनी आपल्या पत्रात केला आहे.

अनिल देशमुख यांनी आरोप फेटाळले 

परमबीर सिंग यांच्या पत्रात केलेल्या आरोपांनंतर तात्काळ गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्विट करत आरोप फेटाळले आहेत. आपल्या ट्विटमध्ये अनिल देशमुख म्हणतात "मुकेश अंबानी प्रकरणी तसेच मनसुख हिरन हत्याप्रकरणी सचिन वाझे यांचा सहभाग स्पष्ट होत असताना व त्याचे धागेदोरे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यापर्यंत पोहोचणार असल्याची शक्यता तपासातून होत असताना परमबीर सिंग यांनी स्वत:ला वाचवण्यासाठी तसेच पुढच्या कायदेशीर कारवाई पासन स्वत:चा बचाव करण्यासाठी हा खोटा आरोप केला आहे."

गृहमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा - देवेंद्र फडणवीस

देवेंद्र फडणवीस म्हणाले, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी आपल्या पत्रातून जे आरोप केले आहेत ते खूपच गंभीर आहेत. महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांवर तात्काळ राजीनामा द्यावा किंवा मुख्यमंत्र्यांनी त्यांना पदावरुन हटवावे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी लिहिलेले पत्र केवळ खळबळजनक नाही तर धक्कादायक आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात डीजी रँकच्या अधिकाऱ्याने इतक्या खुलेपणाने गृहमंत्र्यांबद्दल अशा प्रकारचं पत्र लिहिलण्याची पहिलीच वेळ आहे. या पत्रात त्यांनी एक चॅट जोडली आहे. ती व्हॉट्सअॅप आहे की एसएमएस आहे मला माहिती नाही. पण त्यांनी जे काही सांगितलं आहे तो थेट पुरावा एक प्रकारे दिसत आहे की त्यातून अशाप्रकारची पैशाची मागणी झाली आहे. त्यामुळे हे एकूणच प्रकरण गंभीर आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी