LIVE UPDATE: [VIDEO] डोंगरी दुर्घटनेप्रकरणी मुख्यमंत्र्यांकडून 'एवढी' आर्थिक मदत जाहीर

मुंबई
रोहित गोळे
Updated Jul 17, 2019 | 10:52 IST

Dongri Building Collapsed: मुंबईतील डोंगरी येथे एक चार मजली इमारत कोसळली आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत दहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.

building collapse_ANI
मुंबईतील डोंगरी येथे ४ मजली इमारती कोसळली  |  फोटो सौजन्य: ANI

थोडं पण कामाचं

 • डोंगरी भागातील चार मजली इमारत कोसळली
 • या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली ४० ते ५० जण अडकल्याची भीती
 • कोसळलेली इमारती म्हाडाची असल्याची माहिती

मुंबई: मुंबईतील डोंगरी भागात केसरबाई ही चार मजली निवासी इमारत कोसळली असल्याचं प्राथमिक वृत्त हाती आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या इमारतीच्या ढिगाऱ्याखील अडकून तब्बल १४ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती प्रशासनाकडून मिळते आहे. दरम्यान, मदतकार्य अद्यापही सुरुच आहे. पण अजूनही ढिगाऱ्याखाली काही जण अडकल्याची भीती असल्याने मृतांचा आकडा आणखी वाढू शकतो. दुर्घटनाग्रस्त इमारतीत जवळजवळ १५ कुटुंब राहत होती. डोंगरी भागातील कोसळलेली ही इमारत जवळपास ८० ते १०० वर्ष जुनी होती. पण नेमकी ही इमारत कशामुळे कोसळली याबाबत अद्याप कोणतीही माहिती समजू शकलेली नाही. अचानक झालेल्या दुर्घटनेमुळे परिसरात एकच खळबळ माजली होती. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेतली. अग्निशमन दलाचे जवान हे ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत. तसेच एनडीआरएफचे जवान देखील लोकांना वाचविण्यासाठी मोठी शर्थ करत आहेत.

सुरुवातीला अशी माहिती देण्यात येत होती की, दुर्घटनाग्रस्त इमारत ही म्हाडाची होती. तसेच ती धोकादायकही होती. पण नंतर याबाबत म्हाडाकडून असं स्पष्टीकरण देण्यात आलं की, ही इमारती म्हाडाची नसून ती अनधिकृत होती. त्यामुळे या दुर्घटनेवर म्हाडाने आपले हात वर केले आहेत. डोंगरी परिसरात अनेक जुन्या इमारती असून त्या अतिशय दाटीवाटीने बांधण्यात आलेल्या आहेत. यामुळे मदत कार्यात अद्यापही बऱ्याच अडचणी येत आहेत. सुरुवातीला इमारत कोसळल्यानंतर स्थानिकांनी मदत करण्यास सुरुवात केली होती. पण आता अग्निशमन आणि एनडीआरएफचे जवान सलग बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत. आतापर्यंत काही जणांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आलं आहे. जखमींना तात्काळ उपचारासाठी जे.जे रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे. 

 

 

या घटनेनंतर मुंबई महापालिकेने हाय अर्लट जारी केला असून जखमींना तात्काळ उपचार मिळावेत यासाठी सेंट जॉर्ज, केईएम आणि जे.जे रुग्णालय येथील सर्व रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. सध्या जखमींना शक्य तितक्या लवकर बाहेर काढण्यात येत आहेत. या मदतकार्यात स्थानिक लोकंही मोठ्या प्रमाणात सहभागी झाले आहेत. 

LIVE UPDATE:

 1. मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर, तर जखमींना देखील ५० हजारांची मदत, मुख्यमंत्र्यांनी केलं जाहीर 
 2. डोंगरी इमारत दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढला, आतापर्यंत 14 जणांचा मृत्यू
 3. मृतकांचा आकडा १०वर, आठ जखमी
 4. दुर्घटनेत सात जणांचा मृत्यू तर आठ जण जखमी
 5. आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू
 6. मृतकांचा आकडा वाढला 
 7. दुर्घटनेत चार जणांचा मृत्यू
 8. मृतकांचा आकडा वाढला
 9. मृतकांची नावे - साबिया शेख (२५ वर्षे), अब्दुल सत्तार शेख (५५ वर्षे), १५ वर्षीय मुलाचा मृत्यू
 10. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दुर्घटनेत ३ जणांचा मृत्यू 
 11. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार इमारत दुर्घटनेत २ जणांचा मृत्यू
 12. इमारत नेमकी कुणाची होती याबाबत संभ्रम कायम
 13. इमारत म्हाडाची नव्हती तर ही अनधिकृत इमारत होती: विखे-पाटील
 14. कोसळलेली इमारत ही म्हाडाची नव्हती. ती एका ट्रस्टची होती: वैशाली गडपाले, मुख्य जनसंपर्क अधिकारी, म्हाडा
 15. घटनास्थळी आता फार कुणी जाऊ नये, जेणेकरुन मदतकार्यात अडचणी येणार नाही: मुख्यमंत्री
 16. विकासकाने वेळेते काम सुरु का केलं नव्हतं? याचीही चौकशी केली जाईल: मुख्यमंत्री
 17. विधानपरिषदेची विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडेंनी घटनास्थळी भेट देऊन, मदत कार्याची केली पाहणी
 18. कोसळलेल्या इमारतीच्या बाजूची इमारत खाली करण्यात आली
 19. दोषींवर कठोरात कठोर कारवाई करु: उदय सामंत 
 20. ही इमारत पुर्नविकासासाठी देण्यात आली होती: उदय सामंत 
 21. ढिगारा उपासण्यासाठी घटनास्थळापासून मुख्य रस्त्यापर्यंत मानवी साखळी 
 22. चिंचोळ्या रस्त्यांमुळे घटनास्थळापर्यंत जेसीबी पोहचणं अशक्य, बचावकार्यात मोठ्या प्रमाणात अडचणी
 23. इमारती दुर्घटनेत आतापर्यंत १२ जणांचा मृत्यू: राधाकृष्ण विखे-पाटील 
 24. आतापर्यंत चार ते पाच जणांना बाहेर काढण्यात आलं आहे
 25. मुंबईतील डोंगरीत ४ मजली इमारत कोसळली
 26. केसरबाई नावाची इमारत कोसळली
 27. ढिगाऱ्याखाली ४० ते ५० जण अडकल्याची भीती
 28. अग्निशमन दलाकडून घटनास्थळी मदत, बचावकार्य सुरू
 29. ५ ते २० कुटुंब या इमारतीत राहत होते
 30. एनडीआरएफची टीम घटनास्थळाकडे रवाना

 

 

मिळालेल्या माहितीनुसार, ही इमारत जवळजवळ ८० वर्ष जुनी होती. त्यामुळे ती बरीच जर्जर झाली होती. पण तरीही या धोकादायक इमारतीत अनेक कुटुंब राहत होते. पण या इमारतीला धोकादायक इमारतींमध्ये नाव नसल्याची माहिती मिळते आहे. म्हणजे म्हाडाच्या अधिकाऱ्यांकडून करण्यात आलेल्या सर्वेक्षणात या इमारतीला धोकादायक जाहीर करण्यात आलेलं नव्हतं.  

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी