Mumbai wall collapsed: मुंबईतील घाटकोपर परिसरात एका इमारतीची संरक्षक भिंत कोसळल्याची घटना समोर आली आहे. घाटकोपर येथील पंतनगर परिसरामध्ये इमारत क्रमांक 42 ची संरक्षक भिंत अचानक कोसळली. या इमारतीच्या बाजूला असलेल्या इमारत क्रमांक 43 च्या पायलींगच काम या ठिकाणी सुरू होते. त्यामुळे या इमारतीच्या शेजारी खोल खड्डा खणण्यात आला होता. त्याच दरम्यान शनिवारी सकाळच्या सुमारास इमारतीच्या संरक्षक भिंतीचा काही भाग हा थेट शेजारील खड्ड्यात पूर्णपणे कोसळला. (Ghatkopar building security wall collapsed in pant nagar mumbai watch live video)
या घटनेमुळे इमारत क्रमांक 42 ला धोका निर्माण झाला असून सुरक्षिततेच्या कारणास्तव ही इमारत पूर्णपणे रिकामी करण्यात आली आहे. तेरा माळ्याची ही इमारत असून त्यामध्ये 65 कुटुंब ही वास्तव्यास आहेत. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या आणि पालिकेचा आपत्कालीन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झालं. सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवितहानी झालेली नाही.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.