Jitendra Awhad on OBC : माझा ओबीसींवर विश्वास नाही, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांचे विधान

मुंबई
Updated Jan 04, 2022 | 20:40 IST

Jitendra Awhad on OBC जेव्हा लढण्याची वेळ येते तेव्हा ओबीसी समाज लढत नाही, त्यामुळे आपला ओबीसींवर विश्वास नाही असे विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे.

थोडं पण कामाचं
  • जेव्हा लढण्याची वेळ येते तेव्हा ओबीसी समाज लढत नाही,
  • आपला ओबीसींवर विश्वास नाही
  • ओबीसींना आरक्षण मिळवण्यासाठी रस्त्यावर उतरावे लागेल

Jitendra Awhad on OBC :  मुंबई :  जेव्हा लढण्याची वेळ येते तेव्हा ओबीसी समाज लढत नाही, त्यामुळे आपला ओबीसींवर विश्वास नाही असे विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे. ओबीसींवर आजही ब्राह्मणी पगडा आहे, त्यांना अजून माहित नाही की त्यांच्या मागच्या पिढीला मंदिरात प्रवेश नव्हता. आता ओबीसींना आरक्षण मिळवण्यासाठी रस्त्यावर उतरावे लागेल आणि लढावे लागेल तरच आरक्षण मिळेल असेही आव्हाड यावेळी म्हणाले.  
ओबीसींच्या आरक्षणासाठी मंडल आयोगाची स्थापना झाली होती परंतु जेव्हा लढायची वेळ आली तेव्हा ओबीसी लढायला मैदानात नव्हते. तेव्हा दलित समाजाचे लोक लढत होते. ओबीसी समाजावर ब्राह्मण्यवादाचा पगडा असून आपण श्रेष्ठ आहोत असा त्यांचा समज आहे. परंतु चार पिढ्यांपूर्वी आपल्या वडिलांना आजोबांना मंदिरात प्रवेश नव्हता हा अन्याय ओबीसी समाज विसरला आहे. आताही आरक्षणाच्या निमित्ताने ओबीसी समाजातील लोक पुढे येत आहेत, परंतु यासाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करावा लागेल, सरकारशी दोन हात करावे लागतील असे आव्हाड म्हणाले. परंतु ओबीसी लढत नाही, असेल हरी तर देईल खाटल्यावरील अशी वृती काही लोकांची झाली आहे. ओबीसी बांधवांनी फक्त मेळावे घेऊ नये मैदानात उतरून संघर्ष करावा, केंद्र सरकारला सांगावे लागेल ओबीसींचे आरक्षण काढता येणार त्यासाठी लढा द्यावा लागेल असेही आव्हाड म्हणाले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी