Lockdown : लॉकडाऊनबाबत मुंबईच्या महापौरांचे महत्त्वाचे वक्तव्य

मुंबई
Updated Jan 08, 2022 | 03:29 IST

Important statement of Mumbai mayor regarding lockdown : मुंबईतले कोरोना संकट वाढत आहे. यामुळे मुंबईत पुन्हा लॉकडाऊन लागण्याची चर्चा जोरात आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना प्रसारमाध्यमांनी प्रश्न विचारले. प्रश्नांची उत्तरे देताना महापौरांनी लॉकडाऊनबाबत महत्त्वाचे वक्तव्य केले.

थोडं पण कामाचं
  • लॉकडाऊनबाबत मुंबईच्या महापौरांचे महत्त्वाचे वक्तव्य
  • निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेत आहेत
  • मुख्यमंत्र्यांना नागरिकांची काळजी आहे

Important statement of Mumbai mayor regarding lockdown : मुंबई : मुंबईतले कोरोना संकट वाढत आहे. यामुळे मुंबईत पुन्हा लॉकडाऊन लागण्याची चर्चा जोरात आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना प्रसारमाध्यमांनी प्रश्न विचारले. प्रश्नांची उत्तरे देताना महापौरांनी लॉकडाऊनबाबत महत्त्वाचे वक्तव्य केले.

मुंबईसह महाराष्ट्रात कुठे लॉकडाऊन लावावा आणि कुठे नाही तसेच लॉकडाऊन कधी लावावा याबाबतचे सर्व निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेत आहेत. मुख्यमंत्र्यांना नागरिकांची काळजी आहे यामुळे नागरिकांच्या तब्येतीसाठी योग्य तो निर्णय मुख्यमंत्री घेतील. सध्या परिस्थिती बारकाईने लक्ष ठेवण्याचे काम सुरू आहे. नागरिकांनी घाबरण्यापेक्षा खबरदारी घेणे आवश्यक आहे. कोविड प्रोटोकॉलचे पालन करणे आणि मास्क लावणे गरजेचे आहे. 

संसर्ग वेगाने पसरत आहेत. आरोग्य क्षेत्रात तसेच कोविड आघाडीवर काम करणारे अनेकजण कोरोनाबाधीत होत आहेत. सध्या बेड्स पुरेसे उपलब्ध आहेत. पण कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली आणि आरोग्य सुविधांवर पुन्हा ताण येत असल्याचे दिसू लागले तर परिस्थितीचा अंदाज घेऊन मुख्यमंत्री योग्य तो निर्णय घेतील. पण निर्णय घ्याययचा म्हणून ते घाई करणार नाही. 

कोरोनाबाधितांपैकी सौम्य लक्षणे असलेल्या डॉक्टरांचे सूचनांचे पालन केले आणि उपचार करुन घेतले तर ते लवकर बरे होऊ शकतात; असे महापौर म्हणाल्या. महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाच्या गुरुवार ६ जानेवारी २०२२ च्या आकडेवारीनुसार मुंबईत ७९ हजार २६० कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. आतापर्यंत मुंबई महापालिकेच्या हद्दीत ८ लाख ५१ हजार ७५९ कोरोना रुग्ण आढळले. यापैकी ७ लाख ५३ हजार ५३४ बरे झाले. कोरोनामुळे मुंबईत १६ हजार ३८८ मृत्यूची नोंद झाली. तसेच इतर कारणाने मुंबईत २ हजार ५७७ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी