Jitendra Awhad on Inflation । घाटकोपर : जो दुसऱ्यांचे खड्डे बनवायला जातो तो स्वतःच खड्ड्यात कसा जातो याचं आधुनिक काळातलं उदाहरण म्हणजे हा भोंगा हिंदू मुसलमान वाद करण्यासाठी तुम्ही भोंगा उकरून काढला परंतु सगळ्यात जास्त नुकसान हे हिंदूंचाच झालं. मी सुद्धा हिंदू आहे पण मला तुमचं हिंदुत्व मान्य नाही जे इतरांना तुच्छ लेखतात, अशा शब्दात मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी राज ठाकरे यांच्यावर टीका केली घाटकोपर येथील माता रमाबाई आंबेडकरनगरमध्ये बुद्ध पौर्णिमेच्या कार्यक्रमाच्या वेळी ते बोलत होते.
या वेळी जितेंद्र आव्हाड यांनी अनेक विषयांवर आपली मते मांडली. त्यात नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला. तर राज ठाकरे आणि नाना पटोलेंवर टीका केली. तसेच त्यांनी नाना पटोले यांच्यावर आपले मत व्यक्त केले.
महाराष्ट्र सरकारमध्ये अशोक चव्हाण आहेत बाळासाहेब थोरात आहेत. एकाच घरामध्ये मोठा भाऊ छोटा भाऊ यांची भांडणे असतातच परंतु बाहेर जाऊन बोलणं यात तुमची प्रगल्भता दिसते . ही प्रगल्भता नाही इममॅच्युरिटी आहे, अशा शब्दांत नाना पटोले यांना टोला लगावला.
आज भारताचा रुपया पहिल्यांदा इतका खाली गेला आहे की मोदींच्या भाषेत सांगायला गेलं तर भारताची चड्डी काढली आहे. कोणी पेट्रोलवर बोलत नाही, कोणी डिझेलवर बोलत, नाही. घसरलेल्या रुपयांवर बोलत नाही. आम्हांला भोंगा, हिंदुत्त्व यावर बोलायचं आहे. अशा शब्दांत जितेंद्र आव्हाड यांनी टोला लगावला आहे.
तिने पवारांबद्दल लिहीलं त्यामुळे सदाभाऊ ना कदाचित राग येत नसेल परंतु तिने बाबासाहेब आंबेडकरांवर लिहिलेले आहे जर तुम्ही तिला समर्थन करत असाल तर हिंमत असेल तर शिवाजी पार्कात एकटे उभे राहून म्हणून दाखवा की माझं केतकीला समर्थन आहे. मी उद्या तिने लिहिलेली बाबासाहेबांबद्दल ची भीम बांधवांबद्दल लिहिलेली पोस्ट टाकणार आहे ती स्त्री आहे म्हणून तिला सोडून देणं चालणार नाही हा बौद्धिक प्रामाण्यवाद आहे.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.