Bacchu Kadu : बच्चू कडूंच्या प्रश्नावर जयंत पाटील यांना हसू आवरेना

मुंबई
Updated Aug 10, 2022 | 22:12 IST

Jayant Patil । हिंदुत्वासाठी गेले आहेत तर त्यासाठी त्याग केला पाहिजे, मंत्रिपद मिळाले नाही तर वाईट वाटून घ्यायला नको असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटातील नाराज आमदारांना टोला लगावला आहे.

थोडं पण कामाचं
  • बच्चू कडूंच्या प्रश्नावर जयंत पाटील यांना हसू आवरेना
  • हिंदुत्वासाठी गेले आहेत तर त्यासाठी त्याग केला पाहिजे, मंत्रिपद मिळाले नाही तर वाईट वाटून घ्यायला नको
  • काल अनेक शिंदे सरकारचा पहिल्या टप्प्यातील मंत्रीमंडळ विस्तार करण्यात आला.

मुंबई: हिंदुत्वासाठी गेले आहेत तर त्यासाठी त्याग केला पाहिजे, मंत्रिपद मिळाले नाही तर वाईट वाटून घ्यायला नको असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटातील नाराज आमदारांना टोला लगावला आहे. तर नाराज बच्चू कडू आणि नाराज आमदारांच्या माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नावर जयंत पाटील हसू आवरत नव्हते.  (Jayant Patil couldn't stop laughing at Bachu Kadu's question)

अधिक वाचा :  रक्षाबंधन निमित्ताने मराठीतून द्या शुभेच्छा

काल अनेक शिंदे सरकारचा पहिल्या टप्प्यातील मंत्रीमंडळ विस्तार करण्यात आला. या मंत्रिमंडळ विस्तारात अनेक आमदारांना डावलल्यामुळे ते नाराज असल्याच्या चर्चा सुरु आहेत. तर हे नाराज आमदार आता 'मातोश्री'च्या संपर्कात असल्याच्या चर्चा सुरु आहेत.

अधिक वाचा : रिझर्व्ह बॅंकेकडून रुपी को-ऑपरेटिव्ह बँकेचा परवाना रद्द

याच नाराजी नाट्याच्या पार्श्वभूमीवर जयंत पाटील यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले, बऱ्याच शिंदे समर्थक आमदारांना मंत्रिमंडळात स्थान मिळालं नाही. हिंदुत्वासाठी गेले तर त्यासाठी त्याग करायला हवा, वाईट वाटून घ्यायला नको. शिवाय बच्चू कडू (Bachchu Kadu) यांची नाराजी स्वाभाविक आहे. तसंच बच्चू कडू ऐकणार नाहीत. मंत्री होईपर्यंत ते स्वस्थ बसणार नाहीत असंही पाटील म्हणाले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी