राज्यसभेत नाक कापले आता कपडे सांभाळा, किरीट सोमय्यांचा शिवसेनेला इशारा

मुंबई
Updated Jun 18, 2022 | 09:37 IST

kirit somaiya slams congress leader rahul gandhi shivsena leader uddhav thackeray and sanjay raut : राज्यसभेत नाक कापले आता कपडे सांभाळा; असे किरीट सोमय्या मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांना उद्देशून म्हणाले.

थोडं पण कामाचं
  • राज्यसभेत नाक कापले आता कपडे सांभाळा
  • किरीट सोमय्यांचा शिवसेनेला इशारा
  • संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांनी धमक्या देण्याचे राजकारण सुरू केले आहे - सोमय्या

kirit somaiya slams congress leader rahul gandhi shivsena leader uddhav thackeray and sanjay raut : मुंबई : विधान परिषदेची निवडणूक जवळ येऊ लागताच राजकीय वातावरण तापू लागले आहे. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. यात आज भर पडली भाजपच्या किरीट सोमय्या यांची. सोमय्या यांनी विधान परिषदेच्या निवडणुकीच्या तोंडावर थेट शिवसेनेला इशारा दिला. राज्यसभेत नाक कापले आता कपडे सांभाळा; असे किरीट सोमय्या मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांना उद्देशून म्हणाले.

ईडीने राहुल गांधी यांना चौकशीसाठी बोलावले. राहुल गांधींना जावे लागले. आतापर्यंत चार वेळा जाऊन आले तरी सर्वांच्या मनात भीती आहे की पुढे काय होईल. अनिल परब यांनाही ईडीने चौकशीसाठी बोलावले आहे. अनिल परब यांना भीती वाटते म्हणून त्यांनी मुदत मागितली आहे. गेल्यानंतर काय होईल अनिल परब यांनी अनिल देशमुख यांनाच विचारावे; असे किरीट सोमय्या म्हणाले. राहुल गांधींचे सध्याचे वागणे बोलणे म्हणजे चोर मचाये शोर असे आहे; असेही सोमय्या म्हणाले.

संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांनी धमक्या देण्याचे राजकारण सुरू केले आहे. राज्यसभेत प्रमाणेच विधानपरिषदेत देखील असंच राजकारण सुरू ठेवलं तर आम्ही सोडणार नाही, असा इशारा किरीट सोमय्या यांनी दिला. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी