मुंबई : रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी शिवसेनेच्या नेते पदाचा राजीनामा दिल्यावर माध्यमांना प्रतिक्रिया दिली आणि ढसाढसा रडत शिवसेनेतील अनेक गोष्टींवर भाष्य केलं. त्यानंतर किशोरी पेडणेकर यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) म्हणाल्या, आमचे प्रत्येक शिवसैनिक रामदास कदम यांना भाई म्हणायचा. ज्या दिवसापासून रामदास कदम यांनी पक्षात प्रवेश केला तेव्हापासून पक्षाच्या मोठ्या पदावरच ते राहिले. २०-२० वर्षे आमदार, मुलाला आमदारकी, त्यांना विधानपरिषद... शिवसेनेच्या माध्यमातून निवडून गेले आणि मधल्या काळात बरं नसल्याचं सांगत लांब राहिले. काय केलं भाई... या वयात... काल दोन दिवसांपूर्वी म्हणालात मी मरेपर्यंत शिवसेनेतच राहणार. पोरं कुठे जायचे ते जाऊ दे पण मी शिवसेनेत राहिल. भाई असं नका करू... कोणाचा आदर्श ठेवायचा आम्ही....
किशोरी पेडणेकर पुढे म्हणाल्या, काय चाललंय भाई... जायचंय भाई नक्की जा... पण ज्या बाळासाहेबांनी, बाळासाहेबांच्या नंतर उद्धवजी ठाकरे यांनी तुम्हाला जी पदे दिली त्या पदांचा मान तुम्ही स्वत: राखत काम केली. जायचं असेल तर सरळ जा परंतु मातोश्रीवर, उद्धवजी आणि आदित्यजी वर चिखलफेक करू नका. शिवसेनेत सर्वच राबतात. सर्वांनाच कुठे आमदारकी मिळते. आदित्य साहेबांना जर तुम्हाला साहेब असं म्हणायचं नव्हतं तर नका म्हणू... आदित्य साहेबांनी कधी असं म्हटलं नाही की मला साहेब म्हणा.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.