Dhananjay Munde Accident: पंकजा मुंडेंनी घेतली धनंजय मुंडेंची भेट

मुंबई
Updated Jan 13, 2023 | 10:31 IST

भाजपाची नेता पंकजा मुंडे यांनी भेट घेतली राष्ट्रवादीचे माजी मंत्री धनजंय मुंडे यांची ब्रिज कॅंडी रूगणालयात. या भेटी दरम्यान पंकजा मुंडेनी आपल्या भावाच्या प्रकृतीची विचारपूस केली. 

थोडं पण कामाचं
  • काही दिवसांपूर्वी माजी मंत्री धनंजय मुंडे यांचा परळ येथे त्यांच्या गाडीचा अपघात झाला होता.
  • मुंडे बहीण भावातील राजकीय पक्षामुळे शत्रुता सगळ्यांच पहायला मिळते.
  • या भेटी दरम्यान पंकजा मुंडेनी आपल्या भावाच्या प्रकृतीची विचारपूस केली. 

Dhananjay Munde Accident, मुंबई: भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि महाराष्ट्राचे माजी मंत्री धनजंय मुंडे यांची मुंबईच्या ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये जाऊन भेट घेतली. या भेटीत पंकजा यांनी त्यांचे चुलत बंधू धनंजय मुंडे यांच्या तब्येतीची विचारपूस केली.

काही दिवसांपूर्वी धनंजय मुंडे यांच्या कारला परळीतील घराच्या दिशेने जात असताना अपघात झाला होता. या अपघातात धनंजय मुंडे जखमी झाले होते. उपचारांसाठी त्यांना मुंबईत आणण्यात आले. सध्या धनंजय मुंडे यांच्यावर मुंबईच्या ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत आणि त्यांची प्रकृती स्थिर आहे. 

अधिक वाचा :  टीम इंडिया सीरिज जिंकणार? जाणून घ्या प्लेइंग इलेव्हन

मुंडे बहीणभावात मागील काही महिन्यांपासून राजकीय संघर्ष सुरू आहे. पंकजा मुंडे भाजपमध्ये आहेत तर धनंजय मुंडे राष्ट्रवादीत आहेत. राजकीयदृष्ट्या एकमेकांचे विरोधक असलेल्या पक्षात असल्यामुळे पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यात संघर्ष आहे. हा संघर्ष सुरू असला तरी धनंजय मुंडे यांच्या अपघाताची माहिती मिळताच पंकजा यांनी संघर्ष विसरुन बहीणभावाच्या नात्याला प्राधान्य दिले. पंकजा यांच्या व्यतिरिक्त राज्यातील आणखी काही नेत्यांनी पण धनंजय मुंडे यांची हॉस्पिटलमध्ये भेट घेतली.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी