वाधवान कुटुंबियांच्या महाबळेश्वर ट्रिपवरून ठाकरे सरकार अडचणीत, सीएमचे चौकशीचे आदेश

मुंबई
Updated Apr 10, 2020 | 18:54 IST | टाइम्स नाऊ हिंदी

एकीकडे देशात लॉकडाऊनचं गंभीरपणे पालन केलं जातंय तर दुसरीकडे कोरोना व्हायरसमुळे सर्वाधिक प्रभावित असलेल्या महाराष्ट्रात स्वत: ठाकरे सरकारमध्ये बसलेल्या अधिकाऱ्यांनीच लॉकडाऊनचं उल्लंघन केलंय.

Uddhav Thackeray
वाधवान कुटुंबियांच्या महाबळेश्वर ट्रिपवरून सरकार अडचणीत  |  फोटो सौजन्य: Twitter

थोडं पण कामाचं

  • वाधवान कुटुंबियांना महाबळेश्वरला जाण्यासााठी परवानगीचं पत्र देणाऱ्या अधिकाऱ्याला पाठवलं सक्तीच्या रजेवर
  • अमिताभ गुप्ता यांची संपूर्ण चौकशी होणार, गृहमंत्री अनिल देशमुख यांचे आदेश
  • वाधवान प्रकरणावरून ठाकरे सरकार अडचणीत, मुख्यमंत्री आणि एनसीपीमध्ये बिनसल्याची सूत्रांची माहिती

मुंबई: देशात कोरोना व्हायरसच्या संक्रमित रुग्णांचं प्रमाण दररोज मोठ्या संख्येनं वाढतंय. देशात सर्वाधिक रुग्ण एकट्या महाराष्ट्रात आणि मुंबईत आहेत. जिथं संपूर्ण देश लॉकडाऊनमध्ये आहे तिथं राज्य सरकारमधील एका अधिकाऱ्यानं या लॉकडाऊनचं उल्लंघन केलंय. सरकारी अधिकाऱ्यानं केलेल्या या काममुळे आता चोहोबाजूंनी ठाकरे सरकारवर टीका केली जातेय. राज्य सरकारनं लॉकडाऊन असून सुद्धा डीएचएफएल आणि एस बँक घोटाळ्यातील सामिल वाधवान कुटुंबियांच्या २२ सदस्यांना एकत्र खंडाळ्याहून महाबळेश्वरला जाण्याची परवानगी दिली होती.

अमिताभ गुप्ता सक्तीच्या रजेवर

आता या प्रकरणात नियमांचं उल्लंघन करणाऱ्या राज्य सरकारच्या गृह विभागाचे विशेष सचिव आणि अॅडिशनल डीजीपी अमिताभ गुप्ता यांना लगेच सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलंय. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी याप्रकरणी सांगितलं की, ‘माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा केल्यानंतर अमिताभ गुप्ता यांना या प्रकरणाचा तपास पूर्ण होईपर्यंत सक्तीच्या रजेवर पाठवलं गेलं आहे.’ सध्या वाधवान कुटुंबियांना हॉस्पिटलमधून शिफ्ट करून सेंट झेव्हियर्स स्कूलमध्ये क्वारंटीन केलं गेलं आहे.

या कलमांतर्गत गुन्हा दाखल

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितलं की, ज्या बाबूंनी हे पत्र टाईप केलं त्यांच्यावर सुद्धा कारवाई केली जाईल. तर या प्रकरणी कपिल वाधवान आणि त्यांच्या कुटुंबियांविरोधात एफआयआर दाखल केली गेली आहे. आयपीसीच्या १८८,२६९, २७०, ३४ या कलमांतर्गंत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. डीएचएफएलचे प्रमोटर कपिल वाधवान आणि इतर २२ सदस्यांना महाबळेश्वरमध्ये कोविड-१९ च्या प्रतिबंधनात्मक आदेशांचं उल्लंघन केल्याचा आरोप करत ताब्यात घेतलं गेलं आहे.

वाधवान बंधूंनी ईडीसमोर येणार नकार दिला होता

मिळालेल्या माहितीनुसार वाधवान प्रकरणामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात फूट पडली असल्याचं बोललं जातंय. यापूर्वी वाधवान कुटुंबियांनी ईडीसमोर हजर राहण्यात असमर्थ असल्याचं म्हटलं होतं कारण राज्यात लॉकडाऊन सुरू आहे. ज्यांना ताब्यात घेतलं गेलंय, त्यात वाधवान यांचा खाजगी स्टाफ आणि कूक यांचाही समावेश आहे.

वाधवान यांच्या हास्यास्पद दावा

वाधवान यांनी दावा केलाय की, त्यांच्या कुटुंबातील काही ज्येष्ठ लोकांनी तब्येत बरी नव्हती आणि म्हणूनच त्यांना महाबळेश्वरला जायचं होतं. मात्र वाधवान यांचा हा दावा हास्यास्पद आहे कारण महाबळेश्वरमध्ये कुठलंही मोठं हॉस्पिटल नाहीय आणि उपचारांसाठी तिथल्या रुग्णांना वाई किंवा साताऱ्याला यावं लागतं. वाधवान यांनी हा सुद्धा दावा केला की, मुंबईत त्यांना यायचं नव्हतं कारण शहरात कोरोना व्हायरसचे प्रकरणं वाढत आहेत. सीबीआयच्या टीमनं वाधवान यांना ताब्यात घेतलं असून सातारा पोलिसांच्या ते संपर्कात आहेत.

भाजपनं केली गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

तर वाधवान प्रकरणावरून आता भाजपनं राज्य सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. भाजपचे नेते किरिट सोमय्या यांनी म्हटलं की, अशाप्रकारच्या व्हीव्हीआरपी ट्रीटमेंट प्रकरणात राज्याच्या गृहमंत्र्यांनी अनिल देशमुख यांनी राजीनामा द्यावा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी