मुंबई : राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांच्या सुरक्षेत कपात (Security cover slashed) करण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने (Maha Vikas Aghadi Government) घेतला आहे. यासोबतच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार, माजी मुख्यमंत्री नारायण राणे, रावसाहेब दानवे यांच्याही सुरक्षेत कपात करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षेत कपात करण्यात आली असून त्यांच्या ताफ्यातील बुलेटप्रुफ गाडीही काढण्यात येणार असल्याचं वृत्त समोर येत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना झेड श्रेणीची सुरक्षा व्यवस्था होती त्यात कपात करण्यात आली असून आता राज ठाकरेंना वाय प्लस श्रेणीची सुरक्षा व्यवस्था देण्यात येणार आहे.
यासोबतच विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, आमदार प्रसाद लाड, आमदार आशिष शेलार यांच्या सुरक्षा व्यवस्थेत कपात करण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे. राज्यातील नेत्यांना देण्यात येणाऱ्या सुरक्षा व्यवस्थेच्या संदर्भात आढावा घेण्यात आला होता आणि त्यानंतर मंत्रिमंडळ बैठकीत नेत्यांच्या सुरक्षा व्यवस्थेत कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
तर ज्येष्ठ सरकारी वकील उज्वल निकम, अभिनेते शत्रुघ्न सिन्हा, मदत आणि पुर्नवसन मंत्री विजय वडेट्टीवार, कामगार व उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील, महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार, मंत्री संदिपान भुमरे यांच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे
भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली, "सरकारचे धन्यवाद ! आपण माझी सुरक्षा काढली, नक्षलग्रस्त जिल्ह्यात असल्यामुळे ही सुरक्षा देण्यात आली होती. पण आता नक्षलवाद संपलेला दिसतोय. आमची सुरक्षा काढली असली तरीही जनतेच्या हिताच्या सुरक्षेसाठी आमचा आवाज आणखी धारदार होईल."
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.