संजय राठोड यांचा राजीनामा स्वीकारला : मुख्यमंत्री

मुंबई
Updated Feb 28, 2021 | 19:45 IST

CM Uddhav Thackeray press conference: राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला महाविकास आघाडी सरकारची पत्रकार परिषद झाली. 

थोडं पण कामाचं

 • अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद
 • ८ मार्च रोजी अर्थसंकल्पीय अधिवेशन सादर होणार

मुंबई : २०२१ या वर्षाचे राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन (Maharashtra Budget Session) हे मुंबईत १ मार्च २०२१ ते दिनांक १० मार्च २०२१ या कालावधीत होणार आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला महाविकास आघाडी सरकारची (Maha Vikas Aghadi Government) पत्रकार परिषद झाली आहे. पाहूयात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) कुठल्या मुद्द्यांवर भाष्य केलं आहे.

तपास नि:पक्षपातीपणाने झाला पाहिजे : मुख्यमंत्री

सरकार चालवताना आमची जबाबदारी असते ती म्हणजे न्यायाने वागणं. पण गेल्या काही महिन्यांत एकूणच गलिच्छ राजकारण सुरू झालेलं आहे. तपास हा झालाच पाहिजे पण हा तपास नि:पक्षपातीपणाने झाला पाहिजे. जर कोणी दोषी असेल तर तो कोणी किती मोठा असेल तर त्याच्यावर कायद्याने कारवाई झालीच पाहिजे ही सरकारची ठाम आणि स्पष्ट भूमिका आहे. या तपासावर आणि तपास यंत्रणेवर कोणालाही सोडवायचं म्हणून दडपण असू नये त्यासोबतच एखाद्याला लटकवयाचच आहे, त्याला आयुष्यातून उठवायचंच आहे असंही असू नये. हे मी मुद्दाम सांगतोय कारण गेल्या काही दिवसांपासून अशा काही गोष्टी, घटना घडत आहेत की आम्ही म्हणू तीच पूर्व दिशा. 

संजय राठोड यांच्या राजीनाम्यावर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया

संजय राठोड यांनी स्वत:हून आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. संजय राठोड यांचा राजीनामा स्वीकारला आहे. राजीनामा घेणं आणि गुन्हा दाखल करुन मोकळं होणं म्हणजे न्याय देणे नव्हे. ज्यावेळी ही घटना घडल्याचं आम्हाला कळलं त्याचक्षणी या घटनेची निपक्षपणे तपास करण्याचे आदेश दिले आहेत. पोलिसांना तशा सूचना दिल्या आहेत की, एक कालबद्ध ठरवा आणि लवकरात लवकर तपासाचा अहवाल सादर करा. या तपासातून जे सत्य बाहेर येईल त्यात कोणी आरोपी असेल त्याला क्षमा होणार नाही. पण हे सर्व सुरू असताना नुसती आदळ आपट करुन तपासाची दिशा भरकटून टाकायची हा काही प्रकार सुरू आहे ते गंभीर आहे. आधी चौकशी नीट होऊ द्या. ज्या तपास यंत्रणेवर तुमचा अविश्वास आहे ती तपास यंत्रणा तिच आहे तुमच्याकाळातही हिच तपास यंत्रणा होती.

वनखात्याचा कारभार सध्या माझ्याकडे : मुख्यमंत्री 

वनखात्याचा कारभार आता सध्या माझ्याकडे आहे. विधानसभेत या खात्याच्या संदर्भात काही प्रश्न असतील तर मी किंवा त्या खात्याचे राज्यमंत्री त्याला उत्तर देतील.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद 

महाविकास आघाडी सरकारच्या पत्रकार परिषदेतील महत्वाचे मुद्दे 

 1. संजय राठोड यांच्या प्रेमापोटी पोहरादेवी येथे गर्दी झाली
 2. केवळ सत्ता नाही म्हणून आरोप नको
 3. वन खात्याचा कार्यभार सध्या माझ्याकडे 
 4. पूजा प्रकऱणात कुणी दोषी असेल त्यांना सोडणार नाही
 5. राजीनामा घेणं आणि गुन्हा दाखल करुन मोकळं होणं म्हणजे न्याय देणे नव्हे
 6. गेल्या काही काळात गलिच्छ राजकारण चाललं आहे
 7. तपासाची दिशा भरकटवण्याचे काम सुरू आहे
 8. पोलिसांना तपासाबाबत अहवाल सादर करण्याचे आदेश
 9. तपास नि:पक्षपातीपणाने तपास व्हावा ही भूमिका 
 10. संजय राठोड यांनी स्वत:हून राजीनामा दिला
 11. संजय राठोड प्रकरणात गलिच्छ राजकारण 
 12. सरकार चालवताना न्यायाने वागणं आमची जबाबदारी
 13. विरोधी पक्षनेत्यांनी जबाबदारीने बोलावं
 14. महाराष्ट्रातला विरोधी पक्ष हा दुतोंडी आहे
 15. कोरोना योद्धांची विरोधकांकडून थट्टा
 16. ८ मार्च रोजी अर्थमंत्री अजित पवार राज्याचा अर्थसंकल्प सादर करतील
 17. प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, सरकारकडून योग्य ती पावले उचलण्यात येत आहेत
 18. कोरोनाचा धोका अद्याप टळलेला नाहीये
 19. कोरोनाचा धोका पुन्हा वाढताना दिसत आहे
 20. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेला सुरुवात

८ मार्च रोजी अर्थसंकल्प सादर केला जाणार

२०२१ या वर्षातील राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवार दिनांक १ मार्च २०२१ ते दिनांक १० मार्च २०२१ पर्यंत विधान भवन मुंबई येथे होणार आहे. राज्यातील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक त्या उपाययोजना करुन या अधिवेशनाचे नियोजन करण्यात आले आहे. सोमवार दिनांक ८ मार्च रोजी राज्याचा २०२१-२२ या वर्षासाठीचा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी