मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) सोशल मीडियाच्या माध्यमातून राज्यातील जनतेसोबत संवाद साधला आहे. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला काळजी घेण्याचे, शासनाने करुन दिलेल्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. तसेच गर्दी न करण्याचे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केलं आहे. सर्व सण, उत्सव साधेपणाने साजरे केले. कार्तिकी यात्राही साधेपणाने आणि भक्तीभावाने करुया असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
दिवाळी पाडव्यापासून मंदिरे, सर्व धार्मिकस्थळे उघडण्यात आली आहेत. पण या ठिकाणी गर्दी होता कामा नये. कार्तिकीची वारीही गर्दी न करता आणि भक्ती भावाने करुया.
तुम्ही सहकार्य करत आहात आणि त्यामुळे कोरोना बाधितांचा आकडा जरुर करता आला. मी यापूर्वीही म्हटलं होतं की दिवाळीनंतर आपल्याला अधिक काळजी घ्यावी लागेल. कारण गर्दी वाढलेली आहे. तुम्ही कुणीही असं समजू नका की कोरोनाचं संकट नाहीसं झालेलं आहे. अजिबात नाही. इतर देशांत पाहिलं तर कळेल काही देशांत पुन्हा लॉकडाऊन करण्यात आला आहे. दिल्लीत सुद्धा दुसरी-तिसरी लाट आलेली आहे. अहमदाबादमध्ये रात्रीची संचारबंदी करण्यात आली आहे. जर पहिल्या लाटेची आणि या लाटेची तुलना केली तर दुसरी-तिसरी लाट ही नुसती लाट नाही तर त्सुनामी आहे की काय अशी भीती वाटते. अनेकजण गर्दी करत आहेत, मास्क घालत नाहीयेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधताना म्हटलं, उपमुख्यमंत्री अजित पवार एका कार्यक्रमात म्हणाले की, गर्दी इतकी वाढली- इतकी वाढली आहे की त्या गर्दीत कोरोना चेंगरुन मेला की काय? असं वाटत आहे. असं होणार नाहीये, गर्दी झाली तर कोरोना मरणार नाही तर कोरोना वाढणार आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, अनावश्यक गर्दी टाळली गेली पाहिजे. आता ऑफिसेस सुरू झाले, सगळ्या गोष्टी सुरू झाल्या तरी अजूनही आपण शाळा नाही उघडू शकलो. निर्णय घेतला आहे पण अजूनही उघडू शकू की नाही हे प्रश्नांकित आहे. शालेय विद्यार्थी, शिक्षक आजारी असतील तर काय... ही सगळी काळजी घेत आपण पुढे जात आहोत.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.