Maharashtra Politics LIVE: सत्तास्थापनेविरोधातील याचिकेवर रविवारी सकाळी होणार सुनावणी

मुंबई
पूजा विचारे
Updated Nov 24, 2019 | 11:11 IST

राज्यात नवं सरकार स्थापन झालं असून भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनीही उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे.

Maharashtra Government Formation
महाराष्ट्रातील सर्वांत मोठा राजकीय भूकंप  |  फोटो सौजन्य: ANI

आज (शनिवारी) सकाळी भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी थेट दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राजभवनात आयोजित एका कार्यक्रमादरम्यान देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री पदाची शपथ दिली. यावेळी भाजपने हे सरकार नेमकं कुणाच्या पाठिंब्याने स्थापन केलं याबाबत मात्र साशंकता निर्माण झाली आहे. कारण यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. कारण हा पाठिंबा राष्ट्रवादी काँग्रेसने दिला आहे की, अजित पवार यांच्यासोबत आमदारांचा एखादा गट फुटला आहे हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.  

महाराष्ट्रातील सर्वांत मोठा राजकीय भूकंप लाईव्ह अपडेट्स:

 1. सत्तास्थापनेविरोधात शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांनी संयुक्त याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली. रविवारी सकाळी ११.३० वाजता सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार
 2. मुंबई: वाय.बी. चव्हाण केंद्रात राष्ट्रवादी कॉंग्रेसची बैठक सुरू; राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार बैठकीस उपस्थित.
 3. उद्या राज्यपालांच्या वार्षिक परिषदेत सहभागी होण्यासाठी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी दिल्लीत दाखल झाले आहेत.
 4. राष्ट्रवादी आमदारांसाठी बस दाखल, राष्ट्रवादी आमदार एकत्र ठेवले जाणार, बसमधून सगळे आमदार एकत्र जाणार
 5. जयंत पाटलांकडे सर्वाधिकार- मलिक
 6. अजून पाच आमदारांशी संपर्क नाही- मलिक
 7. अजित पवारांनी घेतलेली भूमिका पक्षाला मान्य नाही- नवाब मलिक
 8. कॉंग्रेस नेते रणदीप सुरजेवाला सर्वोच्च न्यायालयात पोहोचले
 9. कॉंग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादीची सुप्रीम कोर्टात याचिका दाखल
 10. भाजपच्या सत्तास्थापनेविरोधात सुप्रीम कोर्टात - पृथ्वीराज चव्हाण
 11. घोडेबाजाराच्या शक्यतेने कॉंग्रेस आमदारांना जयपूरला नेणार
 12. भाजपसोबत गेल्यानं अजित पवारांवर मोठी कारवाई
 13. अजित पावारांना व्हिप काढण्याचा अधिकार नाही, राष्ट्रवादीनं प्रसिद्ध केलेल्या पत्रकात कारवाईची माहिती, जयंत पाटील आता विधीमंडळ नेतेपदी
 14. शहापूरचे आ.दौलत दरोडा बेपत्ता असल्याची पोलिसांत तक्रार
 15. विधीमंडळ पक्षनेतेपदी दिलीप वळसे पाटील यांची निवड
 16. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विधीमंडळ नेतेपदावरुन अजित पवारांची हकालपट्टी
 17. विधीमंडळ पक्षनेतेपदासाठी जयंत पाटील आणि वळसेंची नावं
 18. बंडखोर अजित पवारांवर राष्ट्रवादी कारवाई करणार - सूत्र
 19. खुद्द पवारच याबाबत बैठकीत सूचना देणार, सूत्रांची माहिती, आमदारांना राज्याबाहेर नेण्याची तयारी - सूत्र
 20. कॉंग्रेस,राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे आमदार राज्याबाहेर हलवणार
 21. सुप्रिया सुळे,नवाब मलिक, आणि एकनाथ शिंदे यांच्यात बैठक सुरू, मुंबईतल्या वाय.बी.चव्हाण सेंटरमध्ये राष्ट्रवादी - सेनेत चर्चा
 22. वडेट्टीवारांच्या निवासस्थानी कॉंग्रेस आमदारांची लगबग
 23. कॉंग्रेस आमदारांना जयपूरला हलवणार - अशोक गहलोत
 24. मुंबईत पोहोचल्यावर शपथविधीसाठी आल्याचं कळलं - बनकर 
 25. अजित पवारांच्या गटात राष्ट्रवादीचे फक्त ३ आमदार,महाराष्ट्रातलं नवं सरकार बेकायदेशीर असल्याचा दावा, भाजपच्या सत्तास्थापनेविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका,रात्रीच सुनावणी व्हावी म्हणून वकील कोर्टाच्या निबंधकाकडे
 26. बेपत्ता आमदार सुनील बनसोडे यांना शोधून काढलं, एकनाथ शिंदे आणि शशिकांत शिंदे राष्ट्रवादीच्या बैठकीत,संपर्कात नसलेल्या आमदारांची सेना, राष्ट्रवादीकडून शोधाशोध, राष्ट्रवादीच्या बैठकीला एकूण ५० आमदार उपस्थित, पवारांची चाणक्यनिती कामाला, अजित पवारांवर दबाव वाढला
 27. सरकार स्थापनेची प्रक्रिया बेकायदेशीर, विरोधकांचा दावा, कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेची सुप्रीम कोर्टात याचिका, 
 28. काहीही कर, उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दे - सुप्रिया सुळे, सत्तेसाठी कुटुंबात फूट नको, सुप्रिया सुळेंचा दादांना मॅसेज, सुप्रिया सुळे यांचं अजित पवार यांना आवाहन
 29. राज्याच्या इतिहासातील काळा दिवस - कॉंग्रेस
 30. कॉंग्रेस,शिवसेना आणि राष्ट्रवादी कोर्टात जाण्याच्या तयारीत,सगळ्यांना अंधारात ठेवून शपथविधी, कोर्टात जाणार
 31. अजित पवार ब्रायटनमधून बाहेर पडण्यासाठी कार सज्ज, अजित पवार कुठे जाणार हे मात्र अनिश्चित
 32. राष्ट्रवादीच्या बैठकीवर कॉंग्रेस नेत्यांचं लक्ष, राष्ट्रवादीच्या बैठकीनंतर कॉंग्रेस आमदारांच्या मुक्कामावर निर्णय
 33. चर्चेचं गुऱ्हाळ संपतच नव्हतं,  नको त्या मागण्या वाढल्यानं भाजपसोबत - अजितदादा
 34. सेनेमुळेच राज्यात राष्ट्रपती राजवट, फडणवीसांचा हल्लाबोल
 35.  मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार, आज जे घडलं त्यानं सर्वांना धक्का बसला - उद्धव ठाकरे
 36. आमदारांकरवी अजितदादांचा शरद पवारांना निरोप
 37. 'पक्ष फुटण्यापासून वाचवायचा असेल तर भाजपसोबत चला' 
 38. तीनही पक्ष एकत्र आहेत, घाबरण्याचं कारण नाही - उद्धव ठाकरे
 39. आमदारांसोबतची बैठक संपवून उद्धव ठाकरे हॉटेलमधून बाहेर, आमदारांना शांत राहण्याचा उद्धव ठाकरेंचा सल्ला, शिवसेना आमदारांचा मुक्काम ललित हॉटेलमध्येच राहणार
 40. अजित पवारांच्या मनधरणीचे राष्ट्रवादीकडून प्रयत्न सुरूच, अजितदादांनी राजीनामा द्यावा अशी राष्ट्रवादीची अपेक्षा - सूत्र, 
 41. धनंजय मुंडे राष्ट्रवादीच्या बैठकीसाठी पोहोचले, राष्ट्रवादीच्या बैठकीसाठी धनंजय मुंडे दाखल 
 42. उद्धव ठाकरेंची 'ललित' मधली आमदारांसोबतची बैठक संपली,सगळं लवकरच ठिक करू, उद्धव ठाकरेंचं आश्वासन
 43. अजितदादांना फोन केल्याचं वृत्त सुप्रिया सुळे यांनी फेटाळलं, ६ मिनिटं चर्चा झाल्याच्या बातम्यांचं सुळेंकडून खंडन,काही माध्यमांनी चालवलेल्या बातम्या निराधार - सुप्रिया सुळे
 44. तटकरे निघाले, मात्र अजितदादा अद्यापही श्रीनिवास यांच्या घरी, तटकरे, वळसे-पाटील, आणि मुश्रीफ या तीनही नेत्यांना अजित पवारांचं मन वळवण्यात अपयश 
 45. राष्ट्रवादीच्या बैठकीसाठी सुनील तटकरे रवाना, 
 46. उद्धव ठाकरे हॉटेल ललितला पोहोचले
 47. राष्ट्रवादीचे ७ आमदार पक्षात परतले, ट्विटवरून माहिती, माणिकराव कोकाटे, दिलीप बनकर पुन्हा राष्ट्रवादीत
 48. बऱ्याच आमदारांना फसवून नेल्याची भावना - अशोक चव्हाण, अजित पवारांची समजूत काढणं राष्ट्रवादीचं काम, अजित पवार फेरविचार करतील - अशोक चव्हाण
 49. छत्रपती शिवरायांच्या स्वप्नातील महाराष्ट्र घडवणार - फडणवीस
 50. अजित पवारांच्या समर्थनातून मजबूत सरकार देणार 
 51. सकाळीच देवेंद्र फडणवीसांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ, सत्तास्थापनेनंतर भाजप कार्यकर्त्यांचा मुंबईत जल्लोष,भाजप कार्यालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दाखल, 'मोदीजी है तो मुमकिन है' च्या मुख्यमंत्र्यांकडूनही घोषणा
 52. बाबासाहेबांच्या महाराष्ट्रात लोकशाहीची हत्या - सुरजेवाला
 53. सुनील तटकरे, आणि वळसे पाटील हे अजित पवारांच्या भेटीला, ब्राइटन येथे अजित पवारांच्या भेटीला राष्ट्रवादी नेते, राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांच्या भेटीला
 54. मुंबई भाजप कार्यालयात फडणवीसांच्या नावे बॅनर
 55. दिलीप बनकर,सुनील टिंगल, आणि कोकाटे हे कुणाच्या बाजूनं ?, राष्ट्रवादीचे ११ आमदार फुटले, त्यातील ५ आमदार परत आले - राष्ट्रवादीच्या सूत्रांची माहिती
 56. दुफळी असल्याचा संदेश जाऊ नये यासाठी बॅनर काढले
 57. बारामतीत लावलेले बॅनर राष्ट्रवादीनं काढले 
 58. फडणवीस - अजितदादा राज्याला स्थिर सरकार देतील - गडकरी
 59. क्रिकेट आणि राजकारणात काहीही होऊ शकतं - गडकरी
 60. आम्ही उशीर केला हे आरोप चुकीचे - अहमद पटेल
 61. वेळकाढूपणाचं खापर अहमद पटेलांनी फोडलं राष्ट्रवादीवर
 62. बहुमत होतं, तर तिनही पक्षांनी दावा का नाही केला ? - रविशंकर प्रसाद
 63. स्वार्थासाठी शिवसेनेनं युती तोडली
 64. युतीत राहून शिवसेनेनं भाजप नेत्यांवर टीका केली
 65. रविशंकर प्रसाद यांचा शिवसेनेला टोला
 66. शिवसेनेनं छत्रपती शिवरायांची भाषा बोलू नये - रविशंकर
 67. बाळासाहेबांचे आदर्श न ठेवणाऱ्यांवर काय बोलणार ?
 68. नवीन युती स्थिर सरकार देईल 
 69. महाराष्ट्रात भाजपचा नैतिक विजय होता - रविशंकर प्रसाद
 70. शिवसेना कुणाच्या इशाऱ्यावर वागत होती - रविशंकर प्रसाद
 71. अजित पवार गटाचा भाजपला पाठिंबा
 72. सगळ्या घडामोडींशी पवारांचा संबंध नाही - राऊत
 73. अजित पवारांनी राज्याच्या पाठीत खंजीर खुपसला 
 74. बैठकीत त्यांची देहबोली संशयास्पद होती 
 75. भाजपच्या अंताची सुरूवात महाराष्ट्रातून झाली आहे - राऊत
 76. फसवून नेलेले आमदार परत आलेले आहेत, राऊतांचा दावा
 77. तीनही पक्षाचा एकही आमदार फुटणार नाही - राऊत
 78. राजभवनावरील अजितदादांच्या शपथविधीबाबत माहिती होतं
 79. कॉंग्रेसच्या सर्व आमदारांना जयपूरला हलवणार
 80. सर्व प्रक्रियेसाठी लागणारा वेळ काँग्रेसनं घेतला- पटेल
 81. सर्व आमदार पक्षासोबत राहण्यासाठी काळजी घेणार, काँग्रेसचे आमदार फुटणार नाही, अहमद पटेलांना विश्वास
 82. काँग्रेसचे सर्व आमदार आमच्यासोबत आहेत, राष्ट्रवादी आणि सेनेसोबत काँग्रेसचा कोणताही संभ्रम नाही, काँग्रेस, राष्ट्रवादी, सेना बहुमतचाचणी जिंकणार- पटेल
 83. सत्तास्थापनेसाठी काँग्रेससकडून उशीर झाला नाही, राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानं हा सगळा पेच निर्माण झाला- पटेल
 84. सत्तास्थापनेसाठी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं ठरलं होतं- पटेल
 85. नेहरू सेंटरमध्ये सकारात्मक चर्चा झाली, शपथविधीचा निषेध करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाही- पटेल
 86. संविधानाची अवहेलना करून शपथविधी उरकरण्यात आला- पटेल
 87. कोणालाच न कळवता शपथविधी काहीतरी काळबेरं- पटेल
 88. यांनी तर बेशरमीचा कळस गाठला. निर्लज्जपणाचा कळस गाठला, काँग्रेसकडून याचा निषेध
 89. काँग्रेसला सत्तास्थापनेची संधी राज्यपालांनी दिली नाही- अहमद पटेल
 90. स्वतंत्र बैठकीनंतर काँग्रेस नेत्यांचा माध्यमांशी संवाद
 91. अशोक चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, बाळासाहेब थोरात, मल्लिकार्जुन खर्गे, अहमद पटेल उपस्थित
 92. काँग्रेसची पत्रकार परिषद लाईव्ह
 93. आधी सर्व आमदारांशी बातचित करणार- पवार
 94. आमच्याकडे संख्याबळ, सरकार आम्हीच बनवणार- पवार
 95. पक्षाची मला चिंता वाटत नाही, अशा फाटाफुटीतून मी गेलो आहे.१९८० सालीही माझे आमदार फुटले होते. अजित पवार फुटतील असं वाटलं नव्हतं- पवार
 96. सुप्रिया सुळेला महाराष्ट्रात रस नाही, मुख्यमंत्री होण्यात सुप्रियांना रस नाही- पवार
 97. राष्ट्रवादीचे सर्व आमदार मुंबईतच राहणार, कुटुंब वेगळं पक्ष वेगळं- पवार
 98. पक्षाच्या बैठकीत निर्णय घेतला जाईल. एनसीपीचे सर्व सदस्य आमच्या संपर्कात- पवार
 99. मी पणाविरूद्ध ही लढाई सुरू झाली. यापुढे निवडणुकाच घेऊ नका,पहाटे केंद्रिय मंत्रिमंडळाची बैठक झाली, महाराष्ट्रावर फर्जिकल स्ट्राईक केलं - उद्धव ठाकरे
 100. राज्यात सध्या लोकशाहीचा खेळखंडोबा, आम्ही जे करतो ते उघडपणे करतो, आमचं राजकारण दिवसाढवळ्या चालतं, तुमचा रात्रीस खेळ चालतो, उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल
 101. जनादेशाचा आमच्यावर अनादर केल्याचा आरोप- उद्धव ठाकरे
 102. आम्ही एकत्र आहोत आणि एकत्रच राहणार- शरद पवार
 103. माझ्या सोयीनं भूमिका मांडेन - अजित पवार
 104. बारामतीत शरद पवारांच्या समर्थनार्थ बॅनरबाजी
 105. आम्ही ८० वर्षाच्या योद्ध्यसोबत, बारामतीकर
 106. राज्यपालांची फसवणूक झाल्याची शक्यता, सरकार स्थापनेबाबत आमची खबरदारी,  या सरकारचं नेतृत्त्व शिवसेनेकडेच आहे - शरद पवार
 107. त्यांना बहुमत स्पष्ट करता येणार नाही, त्यांच्याकडे तेवढं संख्याबळ नाही- शरद पवार
 108. सकाळी धनजंय मुंडेंच्या घरी बोलावले होते- शिंगणे, अजित पवार समर्थक आमदार परतले
 109. अजितदादांनी मला फोन करून बोलावलं, आम्ही शरद पवारांसोबत आहोत - आमदार संदिप क्षीरसागर
 110. जे गेलेत, जातील त्यांच्यावर कारवाई करणार, आम्हाला जी कारवाई करायची ती आम्ही करणार- शरद पवार
 111. दिशाभूल करून बोलावलं, डॉ. शिंगणे सकाळी शपथविधीला उपस्थित होते, राजभवनात का नेलं माहित नव्हतं- शिंगणे
 112. शरद पवारांच्या नेतृत्वात काम करणार - डॉ. शिंगणे
 113. डॉ.शिंगणे शपथविधीनंतर माझ्या घरी आले - शरद पवार
 114. अजित पवारांचा शिस्तभंग करणारा निर्णय, देशामध्ये पक्षांतर बंदीचा कायदा आहे- शरद पवार
 115. हा केवळ अजित पवारांचा निर्णय- पवार
 116. काँग्रेस, सेना, राष्ट्रवादीची सरकारची तयारीत- शरद पवार
 117. भाजपला बहुमत स्पष्ट करता येणार नाही - शरद पवार
 118. आम्ही तिघेही एकत्र आहोत आणि एकत्र राहणार
 119. अशा फुटाफूटीतून मी गेलो आहे - शरद पवार
 120. सुप्रिया सुळीेचे नाव मुख्यमंत्रीपदासाठी नव्हतं
 121. कुठलही संकट आलं तरीही एकत्र राहणार
 122. पत्रकार परिषदेत कॉंग्रेस नेते अनुपस्थित
 123. आमच्याकडे १६९ आमदारांची संख्या, आणखी काही अपक्षांचाही पाठिंबा, तिन्ही पक्षांकडे संख्याबळ होतं- शरद पवार
 124. शरद पवार- उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद सुरू
 125. शरद पवार- उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद, काँग्रेसचे नेते परिषदेला उपस्थित नाही.
 126. उद्धव ठाकरे, शरद पवार, आदित्य ठाकरे, संजय राऊत पत्रकार परिषदे ठिकाणी दाखल
 127. आमची लढाई भाजपाच्या 'मी'पणाविरोधात सुरू - उद्धव ठाकरे
 128. कॉंग्रेसचे नेते बैठकीसाठी वाय.बी.चव्हाण सेंटरमध्ये दाखल
 129. १० ते ११ सदस्य अजित पवारांसोबत आहेत - शरद पवार
 130. धनंजय मुंडेंसोबत संपर्क झाला आहे - संजय राऊत
 131. उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे वाय.बी.चव्हाण सेंटरमध्ये दाखल
 132. विधीमंडळ पक्षनेतेपदावरून अजितदादांची हकालपट्टी
 133. उद्धव ठाकरे 'मातोश्री'वरून बैठकीसाठी रवाना
 134. थोड्यात वेळात शरद पवार, ठाकरे माध्यमांशी बोलणार
 135. शरद पवारांच्या पत्रकार परिषदेकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष
 136. सत्तास्थापनेसाठी खूप उशीर केल्याची भावना
 137. कॉंग्रेस आमदार जेष्ठ नेत्यांवर नाराज
 138. पत्रकार परिषदेत अजित पवार यांची हकालपट्टी होण्याची शक्यता
 139. शरद पवार पत्रकार परिषदेसाठी निवासस्थानावरून रवाना
 140. अजित पवार यांची पक्षातून हकालपट्टीची शक्यता
 141. काँग्रेस आमदार ज्येष्ठ नेत्यांवर नाराज- सूत्र
 142. कल्पना नं देता राजभवनावर नेलं - क्षीरसागर
 143. वर्षा बंगल्यावर भाजपची बैठक सुूरू
 144. सुप्रिया सुळे प्रतिक्रिया देताना भावूक
 145. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते सुप्रिया सुळे यांचं व्हॉट्सअॅप स्टेटस, पार्टी आणि पक्षात फुट- सुप्रिया सुळेंचं व्हॉट्सअप स्टेटस
 146. अजित पवार यांनी राज्यपालांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांचं पाठिंबा पत्र दिलं. आमच्याकडे १७० हून अधिक आमदारांचा पाठिंबा आहे- गिरीश महाजन
 147. अजित पवारांनी शरद पवारांना दगा दिला- राऊत 
 148. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवारसाहेब, शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते यांची संयुक्त पत्रकार परिषद. दुपारी १२.३० वाजता यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई
 149. अजित पवार यांच्या राजकीय निर्णयाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पाठिंबा नाही. हा त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे.' असं ट्वीट शरद पवार यांनी केलं आहे. 
 150. शरद पवारांनी राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक बोलावली, संध्याकाळी ४.३० वाजता बैठकीचं आयोजन
 151. अजित पवारांच्या शपथविधीच्या वेळी राष्ट्रवादीचे 15 आमदार उपस्थित होते
 152. देवेंद्र फडणवीसांना ३० तारखेपर्यंत बहुमत सिद्ध करण्याची मुदत.
 153. भाजपने अजित पवार यांच्यासह १५ ते २० आमदारांना फोडून ही सत्ता स्थापन केल्याचं स्पष्ट झालं आहे. 
 154. आज सकाळी ८.०० वाजता राजभवनात जाऊन देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी शपथ घेतली. 
 155. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राजभवनात आयोजित एका कार्यक्रमादरम्यान देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री पदाची शपथ दिली. 
 156. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री, अजित पवार उपमुख्यमंत्री

 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी