Raigad Pen : भोगावती नदीपात्रात आढळलेली वस्तू डमी बॉम्ब; 4 तासांच्या प्रयत्नानंतर संशयास्पद बॉम्ब निकामी

मुंबई
Updated Nov 11, 2022 | 11:34 IST

मुंबई - गोवा हायवेवरील पेणनजीक संशयास्पद वस्तू आढळून आली होती. ही वस्तू डमी बॉम्ब असल्याचे निष्पन्न झालं आहे.  गुरुवारी (10 नोव्हेंबर) सायंकाळच्या सुमारास जिलेटन सदृश्य वस्तू सापडल्या होत्या. दरम्यान नवी मुंबई आणि रायगडच्या बॉम्ब शोधक पथकाच्या मदतीनं हा बॉम्ब निकामी करण्यात यश मिळालं आहे.

थोडं पण कामाचं
  • रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन येथे आणि उरण तालुक्यात संशयित बोट आढळली होती.
  • मुंबई - गोवा हायवेवरील पेणनजीक संशयास्पद वस्तू आढळून आली होती.
  • गुरुवारी (10 नोव्हेंबर) सायंकाळच्या सुमारास जिलेटन सदृश्य वस्तू सापडल्या.

रायगड :  पेणनजीक (Pen) असलेल्या भोगावती नदीच्या (Bhogavati river) पात्रात गुरुवारी सायंकाळी मोठ्या प्रमाणात जिलेटिनच्या (Gelatin) कांड्या वाहून आल्याचे निदर्शनास आले.  यामुळे परिसरात खळबळ माजली. दरम्यान याचा तपास करण्यासाठी मुंबई आणि रायगड  (Raigad) येथील बॉम्ब शोध पथक (Bomb Squad) देखील दाखल झाले, त्यानंतर बॉम्ब निकामी करण्याच्या कामाला सुरूवात झाली. तब्बल चार तासाच्या प्रयत्नानंतर संशयास्पद बॉम्ब निकामी करण्यात आला.  गेल्या महिन्यात रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन येथे आणि उरण तालुक्यात संशयित बोट सापल्याने खळबळ उडाली होती. आता पुन्हा एकदा रायगडमध्ये संशयस्पद वस्तू आढळल्याने पुन्हा एकदा खळबळ उडाली.  (Dummy bomb found in Bhogavati river near Pen, Suspected bomb busted after four-hour attempt)

अधिक वाचा  : शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांवर भररस्त्यात चाकूने वार

मुंबई - गोवा हायवेवरील पेणनजीक संशयास्पद वस्तू आढळून आली होती. ही वस्तू डमी बॉम्ब असल्याचे निष्पन्न झालं आहे.  गुरुवारी (10 नोव्हेंबर) सायंकाळच्या सुमारास जिलेटन सदृश्य वस्तू सापडल्या होत्या. दरम्यान नवी मुंबई आणि रायगडच्या बॉम्ब शोधक पथकाच्या मदतीनं हा बॉम्ब निकामी करण्यात यश मिळालं आहे.

जिलेटिनच्या कांड्या दिसून आल्याची बातमी हाती येताच  पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांच्यासह पोलीस अप्पर पोलीस अधिक्षक अतुल झेंडे, प्रांत विठ्ठल इनामदार,तहसिलदार प्रसाद कालेकर  यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली होती. 

अधिक वाचा  :  संजय राऊतांचा जामीन रद्द करण्याच्या याचिकेवर सुनावणी

शिवाय पेण तालुक्यातील तिन्ही पोलीस ठाण्याचे अधिकारी,कर्मचारी यांनाही तातडीने घटनास्थळी पाचारण करण्यात आले. या जिलेटन कांड्या नदीपात्रातून बाहेर काढण्यासाठी बॉम्ब शोधक पथकासही पाचारण करण्यात आले होते. रात्री उशिरापर्यंत हे शोधकार्य सुरू होते.

या कांड्या वाहून आल्या की कुणी  टाकल्या याबाबत मात्र अधिकृत माहिती उपलब्ध होऊ शकली नाही. दरम्यान या कांड्या निकामी करत असताना पोलिसांनी खबरदारी म्हणून या मार्गावरील वाहतूक बंद केली होती. दरम्यान मुंबई आणि रायगड येथील बॉम्ब शोधक पथकाने हा डमी बॉम्ब निकामी केला आहे. 

दरम्यान, मुंबई- गोवा हायवेवरील पुलाखाली मिळालेल्या स्फोटक सदृश्य वस्तुमुळे संपूर्ण परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. तर, नदीपात्रात आढळलेल्या बॉम्ब सदृश्य वस्तूच्या पडताळणीसाठी रायगड आणि नवी मुंबईतील बॉम्ब शोधक पथकाला पाचारण करण्यात आले होते. यावेळी, सुमारे चार तास सुरु राहिलेल्या पडताळणीमध्ये जिलेटीन सदृश्य स्फोटकांच्या सहाय्यानं डमी बॉम्ब बनवण्यात आल्याचे आढळून आले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी