Sujay Vikhe Patil अहमदनगर: औरंगाबाद, उस्मानाबाद नंतर आता भंडारदरा, नेवासे, टाकळी, संगमनेर, शिर्डी - ही लोकप्रिय ठिकाणं ज्या जिल्ह्यात येतात त्या अहमदनगरचं नाव बदलावं की तेच ठेवाव यावरुन राजकीय वर्तुळात वाद सुरू आहेत.
भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि परभणी जिल्ह्यातील भाजपप्रणित युवा मोर्चाचे अध्यक्ष सुरेश भुमरे यांनी अहमदनगरच्या नामांतराची मागणी नागपुर येथे पार पडलेल्या हिवाळी अधिवेशनात केली होती. यावर शिक्षण मंत्री दीपक केसरकर प्रतिसाद देत म्हणाले होते की, या संबंधिचा प्रस्ताव आधी केंद्राकडे पाठवावा लागेल.
त्यांच्या या भूमिकेमुळे भाजपा विरुध्द भाजपा अशी लढाई पाहायला मिळते आहे. आमदार गोपीचंद पडळकर यांनी अहमदनगरच नाव पुण्यश्लोक अहिल्याबाई नगर करण्याचा प्रस्ताव सादर केलेला. शिंदे - फडणवीस सरकारने या नामांतरास सहमती दर्शविली असली तरी यावर भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी विरोध नोंदवला आहे. ते म्हणाले की, अहमदनगरच नामांतर करायचं की नाही या संबंधित निर्णय घेण्याचा अधिकार नगरातील नागरीकांचा आणि लोकप्रतिनिधींचा आहे. त्यांच मत ऐकल्याशिवाय नामांतराचा निर्णय घेणं हे अयोग्य असल्याची प्रतिक्रीया खासदारांनी मांडली. यामुळे त्यांना धनगर समाजाच्या रोषाला सामारं जावं लागलं. त्यांनी आगामी निवडणुकांमध्ये पिता - पुत्रांना धडा शिकविण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.