उद्धव ठाकरेंवर मनसेच्या अमेय खोपकरांची खोचक टीका

मुंबई
Updated May 15, 2022 | 20:00 IST

MNS Amey Khopkar criticized Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंवर केलेल्या टीकेला मनसेच्या अमेय खोपकरांनी खोचक शब्दात उत्तर दिले. 

थोडं पण कामाचं
  • उद्धव ठाकरेंवर मनसेच्या अमेय खोपकरांची खोचक टीका
  • उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंवर केलेल्या टीकेला मनसेच्या अमेय खोपकरांनी दिले उत्तर
  • बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आत्मसात करण्याची गरज उद्धव ठाकरेंना आहे - खोपकर

MNS Amey Khopkar criticized Uddhav Thackeray : मुंबई : मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी हिंदुत्वाच्या मुद्यावर बोलताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. या टीकेला उद्धव ठाकरेंनी शनिवारी शिवसेनेच्या सभेत बोलताना उत्तर दिले. उद्धव ठाकरेंनी राज ठाकरे यांचा उल्लेख मुन्नाभाई असा केला आणि त्यांच्या डोक्यात केमिकल लोचा झाल्याची टीका केली. या टीकेला मनसेच्या अमेय खोपकरांनी खोचक शब्दात उत्तर दिले. 

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आत्मसात करण्याची गरज उद्धव ठाकरेंना आहे, असे अमेय खोपकर म्हणाले. त्यांना 'लगे रहो मुन्नाभाई' सिनेमाची डीव्हीडी पाठवणार आहे, असेही खोपकर म्हणाले.

उद्धव ठाकरे यांना बाळासाहेब ठाकरे समजलेले दिसत नाही. याउलट लहानपणापासून बाळासाहेबांसोबत वावरत राज यांनी त्यांचे विचार आत्मसात केले आहेत; असे मनसेचे अमेय खोपकर म्हणाले. 'लगे रहो मुन्नाभाई' सिनेमात नायक संजय दत्त महात्मा गांधींचे विचार पुस्तक वाचून आत्मसात करताना दाखविला आहे. ही बाब उद्धव ठाकरेंच्या लक्षात यावी यासाठी त्यांना 'लगे रहो मुन्नाभाई' सिनेमाची डीव्हीडी पाठवित असल्याचे मनसेचे अमेय खोपकर म्हणाले. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी