Raj Thackeray : कोकणात प्रकल्प आले तर स्थानिकांना कळत नाही ? राज ठाकरे यांचा सवाल

मुंबई
Updated Dec 04, 2022 | 19:18 IST

Raj Thackeray : माझा रिफानयरीला विरोध आहे परंतु सध्याची परिस्थिती पाहता राज्याला प्रकल्पांची गरज आहे असे विधान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले आहे. तसेच कोकणात जेव्हा प्रकल्प येतात तेव्हा स्थानिकांना कळत नाही का असा सवालही राज ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.

थोडं पण कामाचं
  • : माझा रिफानयरीला विरोध आहे
  • परंतु सध्याची परिस्थिती पाहता राज्याला प्रकल्पांची गरज आहे
  • असे विधान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले आहे.

Raj Thackeray : रत्नागिरी : माझा रिफानयरीला विरोध आहे परंतु सध्याची परिस्थिती पाहता राज्याला प्रकल्पांची गरज आहे असे विधान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले आहे. तसेच कोकणात जेव्हा प्रकल्प येतात तेव्हा स्थानिकांना कळत नाही का असा सवालही राज ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. (mns chief support refinery project in kokan in ratnagiri press conference)

राज ठाकरे सध्या कोकण दौर्‍यावर आहेत. रत्नागिरीत त्यांनी पत्रकार परिषद घेतली. तेव्हा राज ठाकरे म्हणाले की कोकणातील रिफायनरीवर माझी तीच भूमिका आहे. परंतु गेल्या काही दिवसांत मी अनेक लोकांना भेटलो. गेल्या काही दिवसांत अनेक प्रकल्प राज्याच्या बाहेर गेले आहेत. अशा वेळी राज्यात प्रकल्प हवे आहेत. जेव्हा राज्यात प्रकल्प येतो तेव्हा बाहेर लोक जमिनी विकत घेतात आणि स्थानिकांना योग्य मोबदला मिळत नाही. ग्रामस्थ जेव्हा संध्याकाळी भेटतात आणि गप्पा मारतात, तेव्हा त्यांच्या संवादातून जमिनी विकल्या की नाही यावर चर्चा होत नाही का? जेव्हा कोकणात प्रकल्प येतात तेव्हा स्थानिक नागरिकांना हे माहित नसतं का असेही राज ठाकरे म्हणाले. यंदाच्य कोकण दौर्‍यात आपल्याला सकारात्मक प्रतिसाद मिळाला असे राज ठाकरे म्हणाले. तसेच महाराजांच्या नावाने काही लोकांना फक्त वाद घालायचा आहे त्यांना महाराजांचा आदर्श घ्यायचा नाही असेही राज ठाकरे यांनी नमूद केले. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी