Sandeep Deshpande :मुंबई : कर्नाटकमधील सीमावादावरील राजकारण हे आगामी निवदणुकीसाठी चालले आहे अशी टीका मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केले आहे. तसेच यावर सर्वपक्षीय नेत्यांनी मिळून काही तरी तोडगा काढायला हवा असेही देशपांडे म्हणाले. (mns leader sandeep deshpande criticized bjp karnatak government over border dispute)
मुंबईत आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत देशपांडे म्हणाले की कन्नद वेदिके रक्षण या संघटनेने सीमाभागात तणाव निर्माण केला आहे. कन्नड रक्षण वेदिकेने बेंगळुरू मेट्रोवरील हिंदी फलकांना काळे फासले होते आजही या संघटनेचा हिंदीला विरोध आहे. कन्नड रक्षण वेदिकेचे मुठबर कायकर्ते येतात आणि महाराष्ट्राच्या गाड्यांचे तोडफोड करतात हे कसे शक्य आहे ? कर्नाटक सीमा वाद हा राज्य पुरस्कृत आहे. राज्य सरकारने कन्नड रक्षण वेदिकेला सुपारी दिली होती आणि ही सुपारी वाजवण्याचे काम कन्नड रक्षण वेदिकेने केले आहे असा आरोप संदीप देशपांडे यांनी केला आहे.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.