[VIDEO]: भिंत ओलांडून तरुण मुंबई विमानतळाच्या रनवेवर

मुंबई
Updated Aug 22, 2019 | 23:10 IST

मुंबई विमानतळावर एक विचित्र घटना घडल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. विमानतळाची सुरक्षा भिंत ओलांडून एका व्यक्तीने चक्क विमानतळावर प्रवेश केला. या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे.

Man walks up to plane after jumping over Mumbai airport's emergency gate
भिंत ओलांडून तरुण मुंबई विमानतळाच्या रनवेवर  

थोडं पण कामाचं

  • मुंबई विमानतळावर अचानक शिरला तरुण
  • विमानतळाची संरक्षण भिंत ओलांडून तरुणाचा विमानतळावर प्रवेश
  • सीआयएसएफच्या जवानांनी तरुणाला घेतलं ताब्यात

मुंबई: मुंबई विमानतळावर गुरुवारी दुपारच्या सुमारास एक विचित्र आणि धक्कादायक घटना घडल्याचं समोर आलं आहे. विमानतळावरील रनवेवर अचानक एक तरुण चालत दाखल होत असल्याचं पहायला मिळालं. हा तरुण चालत-चालत रनवेवर उभ्या असलेल्या स्पाईस जेटच्या विमानासमोर जातो. व्हिडिओत आपल्याला स्पष्ट दिसत आहे की, हा तरुण अगदी सहज विमानतळावर चालत आहे आणि स्पाईस जेटच्या विमानाजवळ पोहोचून तो विमानाला हात लावतानाही दिसत आहे. तितक्यात सीआयएसएफचं पथक तेथे दाखल झालं आणि त्या तरुणाला ताब्यात घेतलं.

सीआयएसएफचं पथक त्या तरुणाजवळ दाखल होतं आणि त्यानंतर त्या तरुणाला ताब्यात घेण्यात येतं. गुरुवारी दुपारी १ वाजून ४५ मिनिटांच्या सुमारास हा प्रकार घडला आहे. या प्रकरणी सीआयएसएफच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, हा तरुण सायन परिसरात राहणारा असून तो मनोरुग्ण असल्याची प्राथमिकदृष्टया निदर्शनास आलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दुपारच्या सुमारास हा तरुण सुरक्षा भिंत ओलांडून विमानतळावर प्रवेश केला आणि तो थेट रनवेवर चालत आला. दुपारच्या सुमारास एक व्यक्ती रनवेवर चालत असल्याचं सीआयएसएफच्या जवानांच्या लक्षात आलं आणि त्यानंतर तात्काळ सीआयएसएफचं पथक त्या तरुणाजवळ दाखल होतात. त्यानंतर त्या व्यक्तीला ताब्यात घेण्यात आलं.

सीआयएसएफच्या जवानांनी या तरुणाला ताब्यात घेतलं आणि नंतर पोलिसांच्या स्वाधीन केलं आहे. या तरुणाची चौकशी सुरु असून तो इथपर्यंत कसा पोहोचला आणि त्याचा येथे येण्यामागचा उद्देश काय होता हे त्यानंतरच समोर येईल.

सीआयएसएफच्या जवानांनी त्या तरुणाला पाहिलं आणि त्यामुळे अनुचित प्रकार टळला आहे. पण मुंबई विमानतळावरील सुरक्षा व्यवस्थेवर या प्रकरणामुळे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...