मुंबईत २०० मीटर अंतरासाठी रुग्णवाहिका सेवेसाठी कोरोना बाधिताकडून ८ हजार मागितल्याचा दावा

कोरोना बाधितांचा आकडा मुंबईत सर्वाधिक आहे. याच मुंबईत कोरोना बाधित रुग्णाची लूट होत असल्याचं समोर आलं आहे. एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यानुसार रुग्णवाहिका सेवेसाठी ८ हजार रुपयांची मागणी केल्याचं म्हटलं जात आहे. 

mumbai ambulance service demand 8 thousand rupees for 200 meter distance kurla maharashtra
रुग्णवाहिका सेवेसाठी कोरोना बाधिताकडून ८ हजार आकारले 

थोडं पण कामाचं

  • देशभरात कोरोना बाधित रुग्णांचा आकडा मुंबईत सर्वाधिक 
  • मुंबईत कोरोना बाधितांचा आकडा ४५ हजारांच्या घरात 
  • दिवसेंदिवस कोरोना बाधितांचा आकडा वाढतोच आहे 

मुंबई: देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत कोरोना बाधितांचा आकडा सर्वाधिक आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व प्रयत्न करण्यात येत आहेत. मात्र, त्याच दरम्यान आता वैद्यकीय सेवेच्या उदासीनतेचा एक व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ कोरोना बाधित रुग्णाच्या नातेवाईकाने शूट केला आहे. व्हिडिओत या व्यक्तीने दावा केला आहे की, मुंबईतील कुर्ला परिसरात २०० मीटर अंतरावर रुग्णाला नेण्यासाठी रुग्णवाहिका सेवकांनी ८००० रुपये मागितल्याचं म्हटलं आहे.

व्हिडिओतील व्यक्ती सांगत आहे की, त्याची वहिनी कुला पश्चिम येथील हबीब रुग्णालयात दाखल आहे आणि ती कोरोना बाधित आहे. या रुग्णाला फौजिया रुग्णालयात हलविण्यासाठी रुग्णवाहिकेची आवश्यकता होती आणि त्यासाठी स्थानिक सर्च इंजिनमध्ये रुग्णवाहिकेचा एक क्रमांक मिळाला. या रुग्णवाहिका सेवेसाठी त्यांनी मोठी रक्कम मागितली. दोन्ही रुग्णालयांमधील अंतर हे अवघे १९० मीटर इतकेच आहे.

कोरोना संकटाच्या काळात नागरिकांच्या परिस्थितीचा गैरफायदा रुग्णवाहिका सेवा देणारे घेत असल्याचा आरोप करत त्याने म्हटलं, जर रुग्णवाहिका चालकाने पक्क बिल दिलं तर आम्ही पेमेंट करायला तयार आहोत मात्र, त्याने आपण एक कामगार असल्याचं सांगत त्याने पक्क बिल देण्यास नकार दिला. 

महाराष्ट्र सरकारने खासगी रुग्णालयांमधील सेवेसाठी आकारण्यात येणारे शुल्क निश्चित करुन कमी सुद्धा केले आहे. तसेच मुंबई महानगरपालिका कोरोना बाधित रुग्णांसाठी मोफत रुग्णवाहिका सेवा सुद्धा उपलब्ध करुन देत आहे असे असतानाही या व्हिडिओतील व्यक्ती एक वेगळीच गोष्ट सांगताना दिसत आहे. 

मुंबईत कोरोना बाधितांचा आकडा ४५ हजारांच्या घरात 

मुंबईत गुरुवारी कोरोना बाधितांचा आकडा आणखी वाढला यामुळे मुंबईत कोरोना बाधित रुग्णांचा आतापर्यंतचा आकडा ४४,९३१ इतका झाला आहे. तर कोरोनामुळे आतापर्यंत मुंबईत १४५६ बाधितांचा मृत्यू झाला आहे.

सध्या राज्यात ४६ शासकीय आणि ३७ खाजगी अशा एकूण ८३ प्रयोगशाळा कार्यरत आहेत. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ५ लाख १० हजार १७६ नमुन्यांपैकी ७७ हजार ७९३ जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात ५ लाख ६० हजार ३०३ लोक होम क्वारंटाईनमध्ये  आहेत. राज्यात संस्थात्मक क्वारंटाईन सुविधांमध्ये ७३ हजार ०४९ खाटा उपलब्ध असून सध्या ३० हजार ६२३ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

(नोट - टाइम्स नाऊ वरील व्हिडिओच्या सत्यतेचा दावा करत नाही)


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी