Mansukh Hiren: अंबानींच्या घराजवळ आढळलेल्या गाडी मालकाचा संशयास्पद मृत्यू

Mukesh Hiren found dead: प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ आढळलेल्या जिलेटिनच्या कांड्यांनी भरलेली गाडी मालकाचा मृतदेह आढळून आला आहे. 

Mumbai bomb scare Owner of the Scorpio car Mansukh Hiren found dead his car was found outside mukesh ambani home antilia
अंबानींच्या घराजवळ आढळलेल्या गाडी मालकाचा संशयास्पद मृत्यू  |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • स्कॉर्पिओ गाडीचे मालक मनसुख हिरेन यांचा मृत्यू 
  • मुंब्राजवळ रेतीबंदर खाडीत मनसुख हिरेन यांचा मृतदेह आढळळा 
  • मनसुख हिरेल काल रात्रीपासून बेपत्ता असल्याची कुटुंबियांची तक्रार

Mukesh Hiren found dead: प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या घराजवळ आढळलेल्या जिलेटिनच्या कांड्यांनी भरलेली गाडी मालकाचा मृतदेह आढळून आला आहे. ठाण्यातील मुंब्रा परिसरातील रेतीबंदर (Mumbra retibunder) येथे मनसुख हिरेन (Mansukh Hiren) यांचा मृतदेह आढळून आला आहे. मनसुख हिरेन हे ठाण्यात राहतात आणि काल रात्रीपासून ते बेपत्ता होते अशी माहिती समोर आली आहे. मनसुख हिरेन यांचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. मनसुख हिरेन यांनी आत्महत्या केली असल्याची माहिती ठाणे पोलीस उपायुक्तांनी दिली असल्याचं ट्विट एएनआय वृत्त संस्थेने केलं आहे.

राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत आज (५ मार्च २०२१) रोजी या प्रकरणावरुन काही प्रश्न उपस्थित केले होते. तसेच गाडी मालक मनसुख हिरेन यांच्या सुरक्षेला धोका असल्याने सुरक्षा देण्याचं त्यांनी म्हटलं होतं.

इतक्या मोठ्या घटनेतील मुख्य दुवा असलेल्या मनसुख हिरेन यांचा मृतदेह आढळून आला आहे. हे प्रकरण खूपच गुंतागुंतीचं अशा प्रकारचं तयार झालेलं आहे. अशा प्रकारे या व्यक्तीचा मृतदेह आढळून येतो. मला वाटतं यात नक्कीच काहीतरी गौडबंगाल आहे. त्यामुळे याचा तपास एनआयएने करावा अशी मागणीही देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरापासून अवघ्या काही अंतरावर गुरुवारी (२५ फेब्रुवारी २०२१) एक संशयास्पद स्कॉर्पिओ गाडी आढळून आली. या गाडीची तपासणी केली असता त्यामध्ये जिलेटिनच्या कांड्या आढळून आल्या. तसेच या गाडीत एक धमकीचं पत्र सुद्धा मिळाल्याची माहिती समोर आली. या संपूर्ण घटनेमुळे एकच खळबळ उडाली. मात्र, आता या प्रकरणावरुन राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. 

घटनाक्रम संशय निर्माण करणारा : देवेंद्र फडणवीस

राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या मुद्दयावर भाष्य करताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत म्हटलं, "मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. देशातील सर्व प्रमुख व्यवसायिक मुंबईत राहतात. मुंबईची सुरक्षितता आणि मुंबईत उपलब्ध असलेल्या संधी यामुळे मुंबई हे अनेकांचं माहेरघर झालं आहे. रिलायन्सचे मालक मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर जिलेटिनने भरलेली गाडी, एक धमकीचं पत्र सापडलं. या संपूर्ण घटनाक्रम प्रचंड संशय निर्माण करणारा आहे."

यानंतर एका टेलिग्राम चॅनलवर एक पत्र आलं, 'जैश उल हिंद' नावाने. त्यात पैसे ट्रान्सफर करण्याचं म्हटलं आणि एक क्रिप्टो करंसी अकाऊंट दिले होते. पण नंतर लक्षात आलं की, हे क्रिप्टो करंसी अकाऊंट फेक असल्याचं समोर आलं. पोलिसांनी हे पत्र आल्याचं जाहीर केल्यानंतर दुसऱ्या दिवशी जैश उल हिंदने एक पत्र जाहीर करत म्हटलं आमचा आणि या घटनेचा काहीही संबंध नाही. ते टेलिग्राम अकाऊंट आमचं नसल्याचंही त्यांनी म्हटलं.

देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, "त्या ठिकाणी एक नाही तर दोन गाड्या आढळल्या. रात्री एक वाजता एक गाडी पार्क झाली आणि रात्री तीनच्या सुमारास चालक तेथून निघून गेला. दुसरी गाडी पांढऱ्या रंगाची इनोव्हा होती. या दोन्ही गाड्या एकाच ठिकाणाहून आल्या आणि ते म्हणजे ठाण्यातून आल्या. गाडी आढळल्यानंतर सर्वप्रथम घटनास्थळी मुंबई पोलिसांचे सचिन वाझे तेथे पोहोचले आणि त्यानंतर इतर पोलीस अधिकारी दाखल झाले. मग सचिन वाझे यांना तपास अधिकारी म्हणून घोषित केलं. तीन दिवसांपूर्वी सचिन वाझे यांना तपासावरुन काढले."

अनेक योगायोग आहेत : देवेंद्र फडणवीस

एक म्हणजे स्कॉर्पिओ गाडी मालक आणि सचिन वाझे हे दोघेही ठाण्यातील आहेत. दुसरं म्हणजे दोघांचाही आधीपासून संवाद होता. स्कॉर्पिओ मालक क्रॉफर्ड मार्केटमध्ये गेला आणि त्या ठिकाणी एका व्यक्तीला भेटला. तो व्यक्ती कोण? असा प्रश्नही देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी