आर्यन खानचा जामीन फेटाळला, आर्थर रोड जेलमध्ये रवानगी

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Oct 08, 2021 | 18:35 IST

क्रूझवर ड्रग पार्टी प्रकरणी अटकेत असलेल्या सतरा आरोपींपैकी आर्यन खान आणि इतर दोन आरोपींनी जामीन मिळवण्यासाठी केलेला अर्ज कोर्टाने फेटाळला.

Mumbai Magistrate court rejects bail applications of Aryan Khan and 2 others
आर्यन खानचा जामीन फेटाळला, आर्थर रोड जेलमध्ये रवानगी 

थोडं पण कामाचं

  • आर्यन खानचा जामीन फेटाळला, आर्थर रोड जेलमध्ये रवानगी
  • आर्यन खान आणि इतर दोन आरोपींनी जामीन मिळवण्यासाठी केलेला अर्ज कोर्टाने फेटाळला
  • न्यायालयीन कोठडी झाल्यामुळे आरोपींची रवानगी मुंबईच्या आर्थर रोड जेलमध्ये

मुंबईः क्रूझवर ड्रग पार्टी प्रकरणी अटकेत असलेल्या सतरा आरोपींपैकी आर्यन खान आणि इतर दोन आरोपींनी जामीन मिळवण्यासाठी केलेला अर्ज कोर्टाने फेटाळला. याआधी काल (गुरुवार ७ ऑक्टोबर २०२१) जामीन अर्ज करणारे तिघे आणि इतर पाच अशा आठ आरोपींना मुंबईच्या कोर्टाने चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली. यामुळे सर्व आरोपींची रवानगी मुंबईच्या आर्थर रोड जेलमध्ये झाली. जेलच्या कोविड प्रोटोकॉलनुसार आरोपींना जेलमध्ये क्वारंटाइन केले आहे. क्वारंटाइनची मुदत संपल्यानंतर आरोपींना इतर कच्च्या कैद्यांसोबत (ज्यांची कोर्ट केस सुरू आहे असे कैदी) ठेवले जाईल. Mumbai Magistrate court rejects bail applications of Aryan Khan and 2 others

आर्यन खान हा बॉलिवूड किंग शाहरूख खान याचा मुलगा आहे. यामुळे अनेकांचे त्याच्याशी संबंधित कोर्ट केसकडे लक्ष आहे. कोर्टात जामीन अर्जावर सुनावणी सुरू असताना हा मुद्दा पुढे आला. विशिष्ट व्यक्तींना प्राधान्य आणि वेगळी वागणूक देऊ नये; असे एनसीबीच्या वकिलाने सांगितले. 

ड्रग पार्टी केसमध्ये सर्व आरोपींची एकमेकांसमोर चौकशी करण्याची गरज भासू शकते. या प्रकरणात ठिकठिकाणी धाडी घालून अटक करण्याची कारवाई सुरू आहे. यामुळे आतापर्यंत अटक केलेल्या कोणत्याही आरोपीला जामीन देण्यास आमचा विरोध आहे; अशा स्वरुपाची भूमिका एनसीबीच्या वकिलाने घेतली. कोर्टाने आरोपींचे वकील आणि एनसबीचे वकील यांची बाजू ऐकून घेतल्यानंतर आर्यन खान आणि इतर दोन आरोपींनी जामीन मिळवण्यासाठी केलेला अर्ज फेटाळला.

कोर्टाचा निर्णय - आर्यन खान, अरबाझ मर्चंट आणि मुनमुन धमेचा या तीन आरोपींचा जामीन अर्ज फेटाळला

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी