VIDEO: मुख्यमंत्र्यांबाबत आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्याचं शिवसैनिकांनी केलं मुंडण 

मुंबई
Updated Dec 23, 2019 | 19:06 IST

Man assaulted by Shiv Sena workers: मुख्ममत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात  फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या एका व्यक्तीचं शिवसैनिकांनी जबरदस्ती मुंडण केल्याचा प्रकार समोर आला आहे. 

mumbai man assaulted by shiv sena workers wadala slapped tonsured on camera comment on cm uddhav thackeray maharashtra news marathi
VIDEO: मुख्यमंत्र्यांबाबत आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्याचं शिवसैनिकांनी केलं मुंडण  |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबाबत आक्षेपार्ह पोस्ट करणं पडलं महागात 
  • शिवसैनिकांनी भर रस्त्यात केलं मुंडण 
  • मुंबईतील वडाळा परिसरात घडली घटना 

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत सोशल मीडियातील फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट टाकणं मुंबईतील एका व्यक्तीला चांगलेच महागात पडलं आहे. मुख्यमंत्र्यांबाबत आक्षेपार्ह पोस्ट केल्याने शिवसैनिकांनी या व्यक्तीला भर रस्त्यात उभं करुन त्याचं मुंडण केलं आहे. मुंबईतील वडाळा परिसरात ही घटना घडल्याचं समोर आलं आहे.

नव्याने लागू झालेल्या नागरिकत्व कायद्यावरुन देशभरातील विविध भागांत जोरदार आंदोलने होत आहेत. अनेक राज्यात या आंदोलनांनी हिंसक वळण घेतल्याचं पहायला मिळत आहे. याच आंदोलनावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गेल्या आठवड्यात हिवाळी अधिवेशनादरम्यान भाष्य केलं होतं. आंदोलना दरम्यान दिल्लीतील जामिया विद्यापीठात पोलिसांनी गोळीबार, लाठीचार्ज केला होता. यावरुन उद्धव ठाकरे यांनी या कारवाईची तुलना जालियनवाला बाग हत्याकांडासोबत केली होती.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी जालियनवाला बाग हत्याकांडाशी ही तुलना केल्याने मुंबईतील निवासी असलेल्या हिरामणी तिवारी या व्यक्तीने फेसबुकवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट केली होती. हिरामणी यांनी उद्धव ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट केल्याने शिवसैनिक चांगलेच संतापले आणि त्यांनी हिरामणी तिवारी यांना वडळा परिसरात गाठलं. यानंतर शिवसैनिकांनी त्यांचं भररस्त्यात मुंडण केलं. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून त्याचा व्हिडिओही व्हायरल झाला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट केल्याने संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी हिरामणी तिवारी यांचं जबरदस्ती मुंडण केलं. मात्र, अशाप्रकारे कायदा हातात घेण्याचा अधिकार शिवसैनिकांना कोणी दिला? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. हिरामणी तिवारी याच्या विरोधात शिवसैनिक पोलिसांत तक्रार दाखल करुन कायदेशीर कारवाई करु शकत होते मात्र त्यांनी थेट कायदाच आपल्या हातात घेतल्याचं पहायला मिळत आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...