[VIDEO]: मुंबईत स्पा सेंटरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, ६ मुलींची सुटका

मुंबई
Updated Aug 19, 2019 | 10:53 IST

Sex Racket busted: स्पा सेंटरमध्ये सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा मुंबई पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. मुंबईतील पश्चिम उपनगरातील विलेपार्ले परिसरात पोलिसांनी छापा टाकून या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे.

Spa
प्रातिनिधीक फोटो  |  फोटो सौजन्य: Getty Images

थोडं पण कामाचं

  • स्पा सेंटरमध्ये सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
  • मुंबई क्राइम ब्रांचने स्पा सेंटरवर केली कारवाई
  • सहा थायलंडच्या तरुणींची पोलिसांनी केली सुटका
  • सुटका करण्यात आलेल्या मुली बिझनेस आणि पर्यटन व्हिसावर भारतात
  • शनिवारी सायंकाळी मुंबई पोलिसांच्या क्राइम ब्रांच युनिटने केली कारवाई

मुंबई: स्पा सेंटरमध्ये सुरू असलेल्या एका सेक्स रॅकेटचा पर्दाफाश मुंबईत करण्यात आला आहे. मुंबई पोलिसांच्या क्राइम ब्रांच युनिटने ही करावाई केली आहे. मुंबईतील पश्चिम उपनगरात असलेल्या एका स्पा सेंटरवर शनिवारी सायंकाळी पोलिसांनी अचानक धाड टाकली आणि या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. यावेळी मुंबई पोलिसांनी या स्पा सेंटरमधून सहा थायलंडच्या तरुणींची सुटका केली आहे.

सहा तरुणींची सुटका

शनिवारी सायंकाळच्या सुमारास विलेपार्ले पूर्वेला असलेल्या 'द थाई व्हिला' स्पावर मुंबई क्राइम ब्रांचने धाड टाकली आणि सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. यावेळी पोलिसांनी स्पा सेंटरचा मालक आणि मॅनेजर या दोघांना अटक केली आहे तर सहा मुलींची सुटका केली आहे. सुटका करण्यात आलेल्या या सर्व मुली थायलंडच्या निवासी आहेत. क्राइम ब्रांचच्या युनिट ९ ने ही कारवाई केली आहे.

स्पा सेंटरच्या नावाखाली सेक्स रॅकेट

विलेपार्ले येथे असलेल्या 'द थाई स्पा' सेंटरवर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. विलेपार्ले पूर्वेला असलेल्या दीक्षित मार्गावरील रिशी इमारतीत हा 'द थाई स्पा' सेंटर सुरू होता. हा स्पा सेंटर नावाला होता आणि तेथे चक्क सेक्स रॅकेट सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी शनिवारी कारवाई करत धाड टाकली.

थायलंडच्या मुली व्हिसावर भारतात

छापा टाकल्यानंतर पोलिसांनी स्पा सेंटरमधून सहा तरुणींची सुटका केली आहे. या सर्व मुली पर्यटन आणि बिझनेस व्हिसावर भारतात वास्तव्य करत होत्या अशी माहिती समोर आली आहे. पोलिसांनी टाकलेल्या धाडी दरम्यान घटनास्थळावरुन लॅपटॉप, १.२३ लाख रुपयांची रोकड रक्कम, स्वाईप मशिन, काही कागदपत्रे आणि तीन वाऊचर बूक पोलिसांनी जप्त केले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला असून अधिक तपास करत आहेत.

ठाण्यात बारवर धाड

तर तिकडे ठाण्यात एका बारवर पोलिसांनी कारवाई केली आहे. ठाण्यातील घोडबंदर रोडवर असलेल्या खुशी या लेडिज बारमध्ये अश्लील कृत्य सुरू असल्याने पोलिसांनी तेथे कारवाई केली आहे. शनिवारी रात्री पोलिसांनी ही कारवाई केली आहे. या कारवाई दरम्यान पोलिसांनी एकूण ४५ जणांना अटक केली असून यामध्ये बारबाला आणि ग्राहकांचाही समावेश आहे. तसेच बारचा मालक आणि व्यवस्थापकालाही पोलिसांनी अटक केली आहे. घोडबंदर रोडवर गायमुख परिसरात असलेल्या खुशी बारमध्ये अश्लील चाळे सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे ठाण्यातील कासारवडवली पोलिसांनी या बारवर धाड टाकली. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
[VIDEO]: मुंबईत स्पा सेंटरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, ६ मुलींची सुटका Description: Sex Racket busted: स्पा सेंटरमध्ये सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा मुंबई पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. मुंबईतील पश्चिम उपनगरातील विलेपार्ले परिसरात पोलिसांनी छापा टाकून या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola
Recommended Articles
विधानसभा उपसभापती विजय औटी यांच्यावर राष्ट्रवादीचा गंभीर आरोप, 'ती' क्लिप जनतेसमोर ठेवणार: निलेश लंके
विधानसभा उपसभापती विजय औटी यांच्यावर राष्ट्रवादीचा गंभीर आरोप, 'ती' क्लिप जनतेसमोर ठेवणार: निलेश लंके
महाराष्ट्रातील या विधानसभेच्या जागांवर पडले आरक्षण... पाहा तुमचा मतदार संघ आरक्षित तर नाही ना? 
महाराष्ट्रातील या विधानसभेच्या जागांवर पडले आरक्षण... पाहा तुमचा मतदार संघ आरक्षित तर नाही ना? 
धक्कादायक, पुण्यात फालुद्यात सापडले ब्लेड
धक्कादायक, पुण्यात फालुद्यात सापडले ब्लेड
मराठी माणसाला मारणं गुजराती माणसाला पडलं महागात, मनसेनं दिला दणका
मराठी माणसाला मारणं गुजराती माणसाला पडलं महागात, मनसेनं दिला दणका
लोकलच्या गार्डचा मोबाईल चोरला, लोकल सेवा विस्कळीत 
लोकलच्या गार्डचा मोबाईल चोरला, लोकल सेवा विस्कळीत 
पवार अमित शहांवर भडकले, दिले असे सडेतोड उत्तर
पवार अमित शहांवर भडकले, दिले असे सडेतोड उत्तर
छगन भुजबळ यांच्या प्रयत्नातून येवल्याच्या शिवसृष्टीला प्रशासकीय मान्यता
छगन भुजबळ यांच्या प्रयत्नातून येवल्याच्या शिवसृष्टीला प्रशासकीय मान्यता
[VIDEO] सांगलीत मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर फेकल्या कडकनाथ कोंबड्या आणि अंडी, भीषण अपघात वाचला... 
[VIDEO] सांगलीत मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर फेकल्या कडकनाथ कोंबड्या आणि अंडी, भीषण अपघात वाचला...