मुंबापुरी झाली तुंबापुरी, रेल्वे आणि रस्ते वाहतूक विस्कळीत, सुट्टी जाहीर

Mumbai Traffic Update : मंगळवार संध्याकाळपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबापुरी पुन्हा एकदा तुंबापुरी पुन्हा एकदा तुंबल्याचं चित्र आहे.

mumbai rain latest updates local train service
मुंबापुरी झाली तुंबापुरी, रेल्वे आणि रस्ते वाहतूक विस्कळीत 

थोडं पण कामाचं

  • मंगळवार संध्याकाळपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबापुरी पुन्हा एकदा तुंबापुरी पुन्हा एकदा तुंबल्याचं चित्र आहे.
  • बई आणि उपनगरात पुढच्या २४ तासात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आल्यामुळे महापालिका आयुक्तांनी खबरदारीचा उपाय मुंबई महापालिकेतील कर्मचाऱ्यांना सुट्टी जाहीर केली.
  • क्षिण मुंबईत मेट्रो ३ ची कामे सुरू असल्याने चर्नीरोड, गिरगाव, ग्रँटरोड, काळबादेवी या भागात पाणी साचले होते.

Mumbai Traffic Update मुंबई : मंगळवार संध्याकाळपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबापुरी पुन्हा एकदा तुंबापुरी पुन्हा एकदा तुंबल्याचं चित्र आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी महापालिका कर्मचाऱ्यांना सुट्टी जाहीर केली आहे. मंगळवार सायंकाळी पावसाने जोर धरला. त्यामुळे मुंबई आणि उपनगरातील रस्त्यांवर पाणीच पाणी साचले होते. तसेच ट्रॅकवर पाणी आल्याने रेल्वे वाहतूकही विस्कळीत झाली आहे. मुंबई आणि उपनगरात पुढच्या २४ तासात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आल्यामुळे महापालिका आयुक्तांनी खबरदारीचा उपाय मुंबई महापालिकेतील कर्मचाऱ्यांना सुट्टी जाहीर केली. या काळात सर्व आस्थापना आणि कार्यालये बंद ठेवण्याचे आवाहन चहल यांनी केले आहे. 

मुंबईतील मुसळधार पाऊस पाहता काल रात्री ९ वाजल्यापासून महापालिका काम करत आहे. सध्या २५४ पाणी उपसा पंप चालू आहेत. अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी वगळता कुणीही रस्त्यावर येऊ नये. पाणी तुंबलेल्या ठिकाणी जाऊन मी स्वतः आढावा घेत आहे, अशी माहिती आयुक्त चहल यांनी दिली. त्याचबरोबर नागरिकांनी आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावे, असेही आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त  इक्बाल सिंह चहल यांनी महापालिका प्रशासनाच्या वतीने केले  आहे.

मुंबईतील ट्रॅफिकचा खोळंबा 

सतत कोसळत असलेल्या पावसामुळे मुंबईतील रस्त्यांवर पाणी साचले होते. मुंबईतील हिंदमाता, दादर, वरळी, लोअर परेल, सायन आणि वांद्रे या भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे. तसेच दक्षिण मुंबईत मेट्रो ३ ची कामे सुरू असल्याने चर्नीरोड, गिरगाव, ग्रँटरोड, काळबादेवी या भागात पाणी साचले होते. अनेक सखल भागात पाणी साचल्याने याचा परिणाम रेल्वे आणि रस्ते वाहतुकीवर झाला आहे. रेल्वे ट्रॅकवरही पाणी असल्याने रेल्वे वाहतूक पूर्णपणे ठप्प करण्यात आली आहे. सखल भाग असलेल्या शीव स्थानकातील रेल्वे रूळ पाण्याखाली गेले होते. त्यामुळे दक्षिण मुंबईकडे येणाऱ्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी शीव स्थानकाजवळ अडकले होते. 

मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, शीवकुर्ला, चुनाभट्टीकुर्ला आणि मस्जिद या मार्गावर मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे. त्यामुळे मध्य रेल्वेवरील सीएसएमटी ते ठाणे आणि सीएसएमटी ते वाशी रेल्वे सेवा बंद करण्यात आली आहे. ठाणे ते कल्याण आणि वाशी ते पनवेल शटल सेवा सुरू असल्याचंही मध्य रेल्वेने सांगितलं.

बेस्ट बसचीही ट्रॅफीक वळवली

रस्त्यावर पाणी साचल्यामुळे बेस्टची वाहतूकही वळवण्यात आल्याचं मुंबई महापालिकेकडून सांगण्यात आलं आहे. खालील मार्गांवर वाहतूक वळवण्यात आली आहे.

  1. लिंकिंग रोडमार्गे वांद्रे टॉकीज, जुना खार
  2. भगत सिंह नगरमार्गे शास्त्री नगर, गोरेगाव
  3. जेव्हीपीडी लिंकिंग रोडमार्गे अंधेरी मार्केट सबवे
  4. उड्डाणपुलामार्गे हिंदमाता व भोईवाडा मार्गे शिवडी
  5. भाऊ दाजी रोडमार्गे गांधी मार्केट
  6. सायन मेन रोडमार्गे सायन रोड २४
  7. मर्निया मस्जिद मार्गे मालाड सबवे (पूर्व व पश्चिम)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी