आर्यन, अरबाझ, मुनमुनची कोजागिरी पौर्णिमा जेलमध्येच!

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Oct 14, 2021 | 18:09 IST

कोर्टाने निर्णय राखून ठेवल्यामुळे आरोपी आर्यन खान, अरबाझ मर्चंट आणि मुनमुन धमेचा या तिघांना १९ ऑक्टोबरच्या रात्री जेलमध्येच कोजागिरी पौर्णिमा साजरी करावी लागेल.

Mumbai Special NDPS court reserves order for 20th October on bail application of Aryan Khan, Arbaaz Merchant and Munmun Dhamecha
आर्यन, अरबाझ, मुनमुनची कोजागिरी पौर्णिमा जेलमध्येच! 

थोडं पण कामाचं

  • आर्यन, अरबाझ, मुनमुनची कोजागिरी पौर्णिमा जेलमध्येच!
  • १९ ऑक्टोबरच्या रात्री जेलमध्येच कोजागिरी पौर्णिमा साजरी करावी लागेल
  • निर्णय बुधवार २० ऑक्टोबर २०२१ रोजी जाहीर करू; असे कोर्टाने सांगितले

मुंबई: ड्रग पार्टी प्रकरणी आर्यन खान, अरबाझ मर्चंट आणि मुनमुन धमेचा या तीन आरोपींच्या जामीन अर्जावरील निर्णय मुंबईच्या विशेष एनडीपीएस कोर्टाने राखून ठेवला. निर्णय बुधवार २० ऑक्टोबर २०२१ रोजी जाहीर करू; असे कोर्टाने सांगितले. कोर्टाच्या या निर्णयामुळे आर्यन खान, अरबाझ मर्चंट आणि मुनमुन धमेचा या तीन आरोपींना २० ऑक्टोबर पर्यंत जेलमध्येच राहावे लागेल. तिन्ही आरोपींना जामीन मिळणार की नाही हे २० ऑक्टोबर रोजी कोर्ट काय सांगणार यावर अवलंबून आहे. कोर्टाने निर्णय राखून ठेवल्यामुळे आरोपी आर्यन खान, अरबाझ मर्चंट आणि मुनमुन धमेचा या तिघांना १९ ऑक्टोबरच्या रात्री जेलमध्येच कोजागिरी पौर्णिमा साजरी करावी लागेल. Mumbai Special NDPS court reserves order for 20th October on bail application of Aryan Khan, Arbaaz Merchant and Munmun Dhamecha

व्हॉट्सअॅप चॅटवर युक्तीवाद

जामीन अर्जावर सुनावणी सुरू असताना व्हॉट्सअॅप चॅटवर युक्तीवाद झाला. आरोपी आर्थिकदृष्ट्या संपन्न कुटुबांशी संबंधित आहेत. त्यांनी विदेशात प्रवास केला आहे. तिथे त्यांचे मित्र मैत्रीणी आहेत. या मंडळींशी त्यांचे चॅटिंग सुरू असते तसेच देशातील ओळखीतल्यांशीही चॅटिंग सुरू असते. या चॅटिंगमधील काही शब्द संशयास्पद वाटले तरी ते आजच्या पिढीचे शब्द आहेत. या शब्दांवरुन थेट गंभीर आरोप करण्याची आवश्यकता नाही. अनेकदा सुरुवातीला ज्यावरुन संशय वाटतो त्यात गंभीर काही नसल्याचे आढळते. यामुळे खासगी व्हॉट्सअॅप चॅटचा संदर्भ घेऊन एखाद्याला जेलमध्ये ठेवणे योग्य होणार नाही. कोणाचेही स्वातंत्र्य नाकारणे योग्य नाही त्यामुळे जामीन द्यावा; अशी मागणी आर्यन खान, अरबाझ मर्चंट आणि मुनमुन धमेचा या आरोपींच्या वकिलाने केली. पण ड्रग पार्टी प्रकरणी २० आरोपींना अटक झाली आहे आणि आंतरराष्ट्रीय ड्रग तस्करीशी असलेले लागेबांध तपासले जात आहेत; असे एनसीबीच्या वकिलाने सांगितले. व्हॉट्सअॅप चॅटचा उलगडा होण्यास वेळ लागेल. तसेच आरोपी जेलबाहेर आल्यास साक्षीदारांवर दबाव टाकण्याची आणि पुराव्यांशी छेडछाड करण्याची शक्यता नाकारता येत नाही. आरोपींची आर्थिक स्थिती आणि त्यांचे समाजातील स्थान तपासावर प्रतिकूल परिणाम करू शकते. यामुळे आरोपींना जामीन देण्यास विरोध असल्याचे एनसीबीच्या वकिलाने सांगितले.

आर्यन खानला ३ ऑक्टोबरच्या क्रूज ड्रग्स पार्टी केसमध्ये अटक

आर्यन खानला ३ ऑक्टोबरच्या क्रूज ड्रग्स पार्टी केसमध्ये एनसीबीकडून अटक करण्यात आली होती. यानंतर ८ ऑक्टोबरला त्याला आर्थर रोड जेलमध्ये आणले गेले. किल्ला कोर्टाने त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. 

आर्यन खान जेलबाहेर आल्यास साक्षीदारांवर दबाव आणू शकतो आणि पुराव्यांशी छेडछाड करू शकतो; असे एनसीबीचे म्हणणे आहे. त्यांनी आर्यन, अरबाझ आणि मुनमुनच्या जामिनाला विरोध कायम ठेवला आहे. एनडीपीएस कायद्यातील तरतुदीनुसार आरोपी कटात सामील असणं हा एक गंभीर गुन्हा आहे. तुमच्याकडे ड्रग्ज सापडले नाही तरी जेव्हा एनडीपीएस कायद्यातील गंभीर तरतुदी लावल्या जातात तेव्हा आरोपी मुख्य सुत्रधारा इतकाच दोषी असतो असे एनसीबीतर्फे एएसजी अनिल सिंह यांनी न्यायालयाला सांगितले. एनसीबीने ड्रग पार्टी प्रकरणात आतापर्यंत २० जणांना अटक केली आहे. 

अटकेतील २० जणांपैकी दोन विदेशी आणि दोन भारतीय ड्रग पेडलर आहेत. पेडलरकडून व्यावसायिक मात्रेत ड्रग जप्त केले आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे अधिकारीही या प्रकरणावर लक्ष ठेवून आहेत. आंतरराष्ट्रीय ड्रग तस्करांशी असलेले लागेबांधे शोधण्याचे काम सुरू आहे. यामुळे आरोपींना जामीन देण्यास एनसीबीचा विरोध आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी