[VIDEO]: आसाम नंतर आता महाराष्ट्रात एनआरसी यादी जाहीर होणार: सूत्र

मुंबई
Updated Sep 09, 2019 | 16:37 IST | टाइम्स नाऊ डिजीटल

NRC list: काही दिवसांपूर्वीच आसाममध्ये एनआरसी यादी जाहीर करुन भारतात अवैधरित्या राहणाऱ्या बांगलादेशी नागरिकांची नावे यादीतून वगळली. आता अशीच यादी महाराष्ट्र जाहीर करणार असल्याचं वृत्त समोर येत आहे.

NRC list of Assam
आसामने एनआरसी यादी जाहीर केली (फाईल फोटो)  |  फोटो सौजन्य: IANS

थोडं पण कामाचं

  • नवी मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी
  • आसाम नंतर आता महाराष्ट्रात एनआरसी यादी?
  • नवी मुंबईत स्थापन होणार पहिलं डिटेक्शन सेंटर?

मुंबई: आसाममध्ये (NRC) नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन म्हणजेच राष्ट्रीय नागरिकता नोंदणी यादी जाहीर करण्यात आली. राज्यात अवैधरित्या राहणारे बांगलादेशी नागरिकांना या यादीतून वगळण्यात आलं आहे. या यादीत तब्बल १९.०६ लाख नागरिकांना स्थान मिळालेले नाहीये. त्यानंतर आता अशाच प्रकारची यादी महाराष्ट्रात लागू होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. महाराष्ट्रात अवैधरित्या राहणाऱ्या नागरिकांसाठी डिटेक्शन सेंटर स्थापन करण्याच्या हालचाली सरकारने सुरू केल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, राज्यात अवैधरित्या राहणाऱ्या नागरिकांसाठी डिटेक्शन सेंटर बनवण्यासाठी सरकारच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. यासाठी महाराष्ट्र सरकारच्या गृह मंत्रालयाने नवी मुंबईतील सिडकोकडे डिटेक्शन सेंटरसाठी जागेची मागणी केली आहे. यामुळे आता राज्य सरकारने अवैधपणे राज्यात राहाणाऱ्या बांगलादेशी नागरिकांविरोधात पाऊल उचलण्यास सुरूवात केली असल्याचं दिसत आहे.

काही दिवसांपूर्वी आसाम राज्याने एनआरसी यादी जाहीर करत १९ लाख नागरिकांना अवैध घोषित केलं होतं. त्यानंतर आता महाराष्ट्रातही एनआरसी यादी जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती असून त्यासाठीच डिटेक्शन सेंटर स्थापन करण्याच्या हालचाली सुरू झाल्याचं बोललं जात आहे. 

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राज्य सरकारने सिडकोकडे तीन एकर जागेची मागणी एका पत्राद्वारे केली आहे. ही जागा नवी मुंबईतील नेरुळ परिसरात असून मुंबईपासून २० किलोमीटर दूर आहे. ही जागा मिळाल्यास या जागेवर राज्य सरकारतर्फे डिटेक्शन सेंटर बनवण्यात येणार आहे.

काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी म्हटलं होतं की, आसाममध्ये अवैधरित्या राहणाऱ्या बांगलादेशी नागरिकांचा मुद्दा सोडवण्यासाठी एनआरसीची गरज होती. त्यामुळेच आम्ही एनआरसीचं समर्थन केलं होतं. आता अशाच प्रकारचं पाऊल मुंबईत उचलण्यात यावं जेणेकरुन अवैधरित्या राहणाऱ्या बांगलादेशी नागरिकांना बाहेर केलं जाईल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...