Nawab Malik : समीर वानखेडे यांनी खोटं प्रमाणपत्र सादर केल्याचे सिद्ध होणार, त्यांची नोकरी जाणार, नवाब मलिक यांचा विश्वास

मुंबई
Updated Jan 03, 2022 | 20:38 IST

Nawab Malik एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्या काळात अनेक घोटाळे झाले, हे घोटाळे आम्ही जनतेसमोर आले. त्यामुळे वानखेडे यांची सरकारी नोकरी लवकरच जाणार असा विश्वास राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी व्यक्त केल आहे.

थोडं पण कामाचं
  • समीर वानखेडे यांच्या काळात अनेक घोटाळे झाले
  • वानखेडे यांची सरकारी नोकरी लवकरच जाणार
  • मेघालयचे राज्यपाल सत्यापल मलिक यांनी केलेला गौप्यस्फोट मोठा

Nawab Malik : मुंबई: एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्या काळात अनेक घोटाळे झाले, हे घोटाळे आम्ही जनतेसमोर आले. त्यामुळे वानखेडे यांची सरकारी नोकरी लवकरच जाणार असा विश्वास राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी व्यक्त केल आहे. तसेच मेघालयचे राज्यपाल सत्यापल मलिक यांनी केलेला गौप्यस्फोट मोठा असून हे जर सत्य असेल तर जनता पंतप्रधान मोदींना माफ करणार नाही असे मलिक म्हणाले. (ncp leader criticized pm modi and sameer wankhede press conference )

एका पत्रकार परिषदेत नवाब मलिक म्हणाले की, एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी त्यांच्या कार्यकाळात घोटाळे करत होते, त्यातील अनेक प्रकरणे आम्ही जनतेसमोर आणली होती. त्याचबरोबर विविध लेखी तक्रारीही केल्या. तसेच वानखेडेंना मुदतवाढ देण्यात येऊ नये, अशी मागणी केली होती. अखेर केंद्र सरकारने आज त्यांना मुदतवाढ न देता त्यांना मूळ विभागाकडे वर्ग करण्यात आले आहे. निश्चितच हा योग्य निर्णय असे मलिक म्हणाले. तसेच वानखेडेंना एनसीबीसाठी मुदतवाढ मिळाली नसली तरी त्यांनी जो फर्जीवाडा केला, त्याच्या तक्रारी आम्ही केल्या असून आमच्या तक्रारींवर कारवाई सुरु आहे. जात पडताळणी समितीकडे केलेल्या तक्रारीनंतर त्याची पण चौकशी सुरू आहे. लवकरच त्यावर निर्णय येईल आणि त्यांनी खोटे प्रमाणपत्र जमा केल्याचे सिद्ध होईल. त्याचबरोबर अल्पवयीन असताना स्वतःच्या नावाने सदगुरु बारचा परवाना घेतला होता. युपीएससीमधून नोकरी मिळाली असतानाही त्यांनी हा बारचा उद्योग सुरु ठेवला. तसेच दुसऱ्या लग्नानंतर त्यांनी पत्नीचा व्यवसाय आणि संपत्तीबद्दलल माहिती लपवली होती. त्याबद्दल तक्रार केल्यानंतर तपास सुरू आहे. शिवाय आर्यन खान प्रकरणात एसआयटीकडून देखील तपास सुरू आहे. ज्या तक्रारी  केल्या होत्या, त्याचा पाठपुरावाही करणार असल्याचे मलिक यांनी सांगितले. तसेच जिथे जिथे चुका झाल्या, बेकायदेशीर कामे झाली आहेत, त्या तक्रारी सिद्ध झाल्यानंतर त्यांच्यावर कारवाई होईल असेही मलिक म्हणाले.

तर देश पंतप्रधान मोदींना माफ करणार नाही

शेतकरी आंदोलन आणि कृषी कायदे मागे घेण्यासाठी झालेला संघर्ष संपूर्ण देशाने वर्षभर पाहिला. यामध्ये ५०० हून अधिक शेतकऱ्यांनी आपला जीव गमावला. मात्र या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर मेघालयचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी पंतप्रधानांची घेतलेली भेट आणि त्यावेळी पंतप्रधानांनी केलेले विधान अधिक गंभीर आहे असे नवाब मलिक म्हणाले. तसेच  जर यात सत्यता असेल तर देशाची जनता मोदींना माफ करणार नाही. सत्यपाल मलिक यांनी केलेला हा गौप्यस्फोट अत्यंत गंभीर आहे. शेतकऱ्यांचा मृत्यू आंदोलनामध्ये झाला. केंद्राने तीन कृषी कायदे वेळेत मागे न घेतल्याने, शेतकऱ्यांचे न ऐकल्याने हे आंदोलन वर्षभर सुरू राहीले. त्याबरोबरच लखीमपुर खीरी येथे शेतकरी हत्याकांडही झाले. अशा सर्व घटनांवर पंतप्रधानांकडून अशी असंवेदनशील विधाने येत असतील तर ते योग्य नाही. जर हे सत्य असेल तर देशाची जनता नरेंद्र मोदींना माफ करणार नाही, असेही मलिक यांनी यावेळी नमूद केले. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी