हे होतं भेटीचं कारण, पवार-फडणवीस भेटीबाबत राष्ट्रवादीने केला खुलासा

 राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची सोमवारी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis)यांनी तब्येतीची विचारपूस करण्यासाठी सदिच्छा भेट घेतल्याचे नवाब मलिक म्हणाले.

पवार-फडणवीस भेटीबाबत राष्ट्रवादीने केले खुलासा
NCP reveal Pawar-Fadnavis meeting agenda  |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

  • शरद पवारसाहेबांवर शस्त्रक्रिया झाल्यावर ते हॉस्पिटलमध्ये होते
  • . या कालावधीत अनेक लोकांनी तब्येतीची घरी येऊन विचारपूस केली होती.
  • विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ही सदिच्छा भेट घेतली दुसरं काही नाही असेही नवाब मलिक म्हणाले. 

मुंबई :  राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची सोमवारी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis)यांनी तब्येतीची विचारपूस करण्यासाठी सदिच्छा भेट घेतल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे. (NCP reveal Pawar-Fadnavis meeting agenda)

शरद पवारसाहेबांवर शस्त्रक्रिया झाल्यावर ते हॉस्पिटलमध्ये होते आणि त्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घरी विश्रांती घेत होते. या कालावधीत अनेक लोकांनी तब्येतीची घरी येऊन विचारपूस केली होती. त्याच अनुषंगाने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ही सदिच्छा भेट घेतली दुसरं काही नाही असेही नवाब मलिक म्हणाले. 


महाराष्ट्रात सत्ताधारी आणि विरोधी पक्ष दुश्मनासारखे काम करत नाही ही महाराष्ट्राची परंपरा आहे. इथे व्यक्तीगत नाती टिकवली जातात शिवाय व्यक्तीगत गाठीभेटी या होत असतात. परंतु या भेटी राजकीय कारणासाठी होतात असा अर्थ काढणे चुकीचे असल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले. 

विरोधी पक्षाचे काम विरोधी पक्ष करत असतो तर सत्ताधारी सत्ताधाऱ्यांचे काम करत असतात. महाविकास आघाडी शरद पवारसाहेबांनी बनवली आहे. त्यामुळे कुणीही या भेटीचा चुकीचा अर्थ लावून प्रचार करू नये. शिवाय विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ही सदिच्छा भेट होती असे जाहीर केले आहे असेही नवाब मलिक म्हणाले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी