[VIDEO]: 'या' अटीवर राष्ट्रवादी शिवसेनेला पाठिंबा देण्यास तयार

मुंबई
Updated Oct 30, 2019 | 15:01 IST | टाइम्स नाऊ मराठी

Maharashtra Power Tussle: महाराष्ट्रात सत्ता स्थापनेसाठी सुरु असलेल्या रस्सीखेच दरम्यान आता राष्ट्रवादी काँग्रेसने यामध्ये उडी मारली आहे. आता राष्ट्रवादीने शिवसेनेला पाठिंबा देण्याचं ठरवलं आहे मात्र एका अटीवर..

ncp will support shiv sena to form government in maharashtra sena to make first move vidhan sabha election result 2019
[VIDEO]: 'या' अटीवर राष्ट्रवादी शिवसेनेला पाठिंबा देण्यास तयार  |  फोटो सौजन्य: Twitter

थोडं पण कामाचं

 • सत्ता स्थापनेसाठी शिवसेना-भाजपत रस्सीखेच
 • शिवसेना फिफ्टी-फिफ्टी फॉर्म्युल्यावर ठाम
 • भाजप मुख्यमंत्री पदावर ठाम
 • सत्ता स्थापनेत आता राष्ट्रवादी काँग्रेसची उडी

मुंबई: सत्ता स्थापनेसाठी शिवसेना आणि भाजप यांच्यात सुरु असलेल्या रस्सीखेचमुळे अद्यापही कुठलाही निर्णय झालेला नाहीये. हेच पाहून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने यात उडी घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने शिवसेनेला पाठिंबा देण्यास तयारी दर्शवली आहे मात्र, त्यासाठी शिवसेनेने पुढाकार घ्यावा अशी त्यांची मागणी आहे. जर शिवसेनेने पुढाकार घेत पाठिंब्याची मागणी केली तर आम्ही पाठिंबा देऊ असं राष्ट्रवादी काँग्रेसने म्हटलं आहे.

काँग्रेसही पाठिंब्याला तयार पण...

मंगळवारी राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सुद्धा एक मोठं वक्तव्य केलं आहे. जर सत्ता स्थापनेसाठी शिवसेनेकडून प्रस्ताव आला तर हा प्रस्ताव आमच्या पक्षश्रेष्ठींकडे पाठवून यावर निर्णय घेऊ. म्हणजेच काँग्रेस पक्ष सुद्धा भाजपला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं दिसत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने शिवसेनेला पाठिंबा दिला तरीही शिवसेनेला सत्ता स्थापनेसाठी आणखी आमदारांची आवश्यकता लागणार आहे. शिवसेना ५६+ राष्ट्रवादी ५४ + अपक्ष यांच्या होणारी संख्या साधारणत: १२०च्या घरात जाईल. अशावेळी जर काँग्रेस पक्षाने बाहेरुन पाठिंबा दिला तर शिवसेनेला सत्ता स्थापन करता येईल. 

शिवसेना फिफ्टी-फिफ्टी फॉर्म्युल्यावर ठाम आहे. तसेच मुख्यमंत्री पदाचीही मागणी करण्यात येत आहे. पण भाजपकडून मुख्यमंत्री पद न देता उपमुख्यमंत्री पद देण्याची तयारी झाली असून काही महत्वाची खाती शिवसेनेला सोडण्यात येणार असल्याचं वृत्त आहे. त्यामुळे आता शिवसेना काय निर्णय घेते हे पहावं लागेल.

निवडणुकीनंतर पक्षीय बलाबल

 1. भाजप - १०५ 
 2. शिवसेना - ५६ 
 3. राष्ट्रवादी - ५४ 
 4. काँग्रेस - ४४ 
 5. इतर - १३ 
 6. बहुजन विकास आघाडी - ३ 
 7. एमआयएम - २ 
 8. समाजवादी पक्ष - २ 
 9. प्रहार जनशक्ती पक्ष - २ 
 10. मनसे - १ 
 11. स्वाभिमानी पक्ष - १ 
 12. सीपीआय - १ 
 13. जन सुराज्य शक्ती - १ 
 14. क्रांतिकारी शेतकरी पक्ष - १
 15. शेकाप - १ 
 16. राष्ट्रीय समाज पक्ष - १ 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...