कर्नाटक सरकारच्या खोडसाळपणावर नीलम गोऱ्हे संतापल्या; राष्ट्रपती, पंतप्रधानांकडे केली मागणी

मुंबई
Updated Nov 23, 2022 | 19:21 IST

कर्नाटक सरकारने महाराष्ट्रातील कन्नड माध्यमांच्या शाळांना विशेष अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानंतर शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी संताप व्यक्त केला. त्यांनी थेट राष्ट्रपती आणि पंतप्रधानांकडे मागणी केली आहे.

थोडं पण कामाचं
  • महाराष्ट्र कर्नाटक राज्याच्या सीमा प्रश्नावर वाद
  • प्रक्रियेच्या समन्वयासाठी दोन मंत्र्यांची नियुक्ती
  • महाराष्ट्रातील कन्नड शाळांना कर्नाटक सरकार विशेष अनुदान देणार

मुंबई :  महाराष्ट्र कर्नाटक राज्याच्या सीमा प्रश्नावर गेली अनेक वर्षांपासून वाद सुरू आहे. या सीमावादावरील सर्वोच्च न्यायालयात खटला सुरू आहे. या न्यायालयीन प्रक्रियेच्या समन्वयासाठी काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उच्चशिक्षणमंत्री मंत्री चंद्रकांत पाटील आणि राज्य उत्पादन शुल्कमंत्री शंभूराज देसाई या दोन मंत्र्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अशा आज कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी महाराष्ट्रातील कन्नड शाळांना कर्नाटक सरकार विशेष अनुदान देणार असल्याची घोषणा केली. या निर्णयानंतर विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे संतापल्या. (Neelam Gorhas furious after Karnataka government's mischief; Demand made to President, Prime Minister)

अधिक वाचा : तेव्हा कारवाई झाली असती तर... ;श्रद्धाच्या पत्रावर देवेंद्र फडणवीसांचे मोठे वक्तव्य

नीलम गोऱ्हे म्हणाला, या दोन्ही राज्यांच्या सीमा भागात राहत असलेल्या मराठी भाषिक नागरिकांची महाराष्ट्रात सहभागी होण्याची इच्छा आहे. बेळगाव, भालकी, बिदर सारख्या जिल्ह्यांत ही मागणी अनेक वर्षांपासून सातत्याने होते आहे. यासाठी कर्नाटक व्याप्त महाराष्ट्रात अनेकांनी आपले बलिदान दिले आहे. मात्र अजूनही याबाबत काही निर्णय न झाल्याने येथील जनता याबाबत आतुरतेने वाट पाहत आहे. 

कन्नड भाषिक शाळांना अनुदान देऊन कर्नाटक सरकार खोडसाळपणा करीत आहे. खरेतर महाराष्ट्र राज्य देखील  इतर भाषांना प्रोत्साहन देत असते. भाषिक शाळांना अनुदान देत आहे. मात्र कन्नड भाषेचे आम्हीच खरे पुरस्कर्ते आहोत किंवा कसे याबाबत आपला टेंभा मिरविण्याची कर्नाटक सरकारची सुरू असलेली धडपड दिसत आहे. असे वागणे बरोबर नाही याबाबतची जाणीव कर्नाटक सरकारला महाराष्ट्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाच्या आणि माननीय राष्ट्रपती, पंतप्रधानांच्या माध्यमातून करून द्यायला हवी अशी मागणी केली

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी