NIA, ED Raids: 14 राज्यांत PFI च्या ठिकाणांवर  ED आणि NIAचे छापे, महाराष्ट्रातून 20 तर देशभरातून 100 जण ताब्यात

मुंबई
सुनिल देसले
Updated Sep 22, 2022 | 12:27 IST

ED and Maharashtra ATS raids: पीएफआयच्या संबंधित ठिकाणांवर संपूर्ण देशभरात छापेमारी करण्यात आली आहे. या छापेमारीत 100 हून अधिक जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

NIA Maharashtra ATS raids PFI offices in 14 states including Maharashtra read in marathi
देशभरात ED आणि NIAचे छापे, महाराष्ट्रातून 20 तर देशभरातून 100 जण ताब्यात  |  फोटो सौजन्य: ANI
थोडं पण कामाचं
  • NIA आणि ED कडून धाडसत्र, देशभरातील 14 राज्यांत छापेमारी
  • 100 हून अधिक जणांना घेतलं ताब्यात
  • महाराष्ट्रातही एटीएसची कारवाई

ED Raids across India: देशभरातील 14 राज्यांत एनआयएकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. टेरर लिंक संदर्भात NIA ने पीएफआयच्या संबंधित ठिकाणांवर छापेमारी केली आहे. महाराष्ट्र एटीएसकडूनही राज्यात कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत देशभरातून 100 हून अधिक जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. एनआयएकडून सुरू असलेल्या या कारवाईत 300 हून अधिक अधिकारी सहभागी आहेत. (NIA Maharashtra ATS raids PFI offices in 14 states including maharashtra read in marathi)

हे पण वाचा : उद्धव ठाकरेंची जोरदार बॅटिंग, वाचा भाषणातील टॉप 10 मुद्दे

महाराष्ट्रात 20 ठिकाणी छापे 

औरंगाबादमधून पीएफआयचे चार कार्यकर्ते एटीएसच्या ताब्यात 

मालेगावमधून पीएफआयशी संबंधित एक जण एटीएसच्या ताब्यात 

पुण्यातन पीएफआयचे कार्यकर्ते अब्दुल कय्याम शेख आणि रझा खान ताब्यात

जालन्यातील रहेमान गंज भागातून एक व्यक्ती जळगावातून ताब्यात 

 नांदेडमध्ये पीएफआयचा एक पदाधिकारी एनआयएच्या ताब्यात 

नवी मुंबईतील नेरूळमधून 4 जण एनआयएच्या ताब्यात

हे पण वाचा : ही हॉट अभिनेत्री आता होणार गोवेकर!

महाराष्ट्रात कोणत्या भागात छापे? 

मुंबई 

नवी मुंबई 

कोल्हापूर 

भिवंडी 

मालेगाव 

जळगाव 

कोंढवा, पुणे 

औरंगाबाद

जालना

बीड

परभणी 

नांदेड

हे पण वाचा : जेव्हा इलियाना डिक्रूजने पुरुषांसंदर्भात केला होता गौप्यस्फोट

या कारवाईनंतर पीएफआयचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून विविध ठिकाणी रस्त्यावर उतरुन आंदोलन करण्यास सुरुवात केली आहे. एनआयएने छापेमारी दरम्यान पीएफआयचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि दिल्ली पीएफआयचे अध्यक्ष परवेज अहमद याला अटक केली आहे. एनआयएने तमिळनाडूतील कोयंबतूर, कुड्डालोर, रामनाड, डिंडुगल, थेनी आणि थेनकासीसह अनेक ठिकाणांवर पीएफआयच्या पदाधिकाऱ्यांच्या संपत्तीची झाडाझडती सुरू आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी