Devendra Fadnavis : मुंबई : अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी जो प्रस्ताव आज मांडण्यात आला. त्या प्रस्तावातून हे सरकार किती असुरक्षित आहे असे लक्षात येतं अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. गेली ६० वर्षे महाराष्ट्रात अध्यक्षपदाची निवडणूक गुप्त मतदान पद्धतीने झाली, परंतु १७० आमदार असणार्या महाविकास आघाडी सरकारला नियम बदलून खुल्या पद्धतीने ही निवडणुकीची ही नामुष्की आली असेही फडणवीस म्हणाले. (opposition leader devendra fadnavis criticized mva government over winter session )
महाविकास आघाडीमध्ये इतका असंतोष आहे की जर गुप्त मतदान झाल्यास मतं फुटण्याची त्यांना भिती आहे. म्हणूनच त्यांनी नियम बदलण्याचा घाट घातला आहे. सरकारचा अपाल्याच आमदारांवर विश्वास राहिलेला नाही. नियम समितीत बहुमत असतानाही त्यांनी सदस्यांना निमंत्रण दिले नाही, या वेळी आम्ही पोलची मागणी केली ती ही सरकारने फेटाळून लावली यावरून सरकार किती घाबरलेले आहे हे दिसत आहे असेही फडणवीस म्हणाले.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.