डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरण, तिन्ही आरोपी डॉक्टर अटकेत

मुंबई
Updated May 29, 2019 | 08:45 IST | टाइम्स नाऊ मराठी

डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणी मुंबई पोलिसांनी तिसऱ्या आरोपी महिला डॉक्टरलाही अटक केली आहे. आग्रीपाडा पोलिसांनी तिसरी आरोपी डॉक्टर अंकिता खंडेलवाल हिला अटक केली आहे.

Agripada Police personnel with accused Dr
डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरण, तिन्ही आरोपी डॉक्टर अटकेत   |  फोटो सौजन्य: ANI

मुंबई: मुंबईतील प्रसिद्ध नायर रुग्णालयातील डॉ. पायल तडवी हिच्या आत्महत्या प्रकरणीत पोलिसांनी आता सर्वच्या सर्व तिन्ही आरोपी डॉक्टरांना अटक केली आहे. मुंबई पोलिसांनी रात्री उशीरा आरोपी डॉक्टर अंकिता खंडेलवाल हिला अटक केली. तर, मंगळवारी पोलिसांनी डॉ. भक्ती मेहरे आणि हेमा आहूजा यांना अटक केली आहे. पायल तडवी हिचा मृतदेह हॉस्टेलमध्ये आढळल्यानंतर या तिन्ही आरोपी डॉक्टर फरार होत्या.

नायर रुग्णालयातील वैद्यकिय पदव्युत्तर शिक्षण घेत असलेल्या पायल तडवी हिने हॉस्टेलच्या रूममध्ये बुधवारी आत्महत्या केली. रॅगिंगला कंटाळून पायलने आत्महत्या केली. पायल तडवी आदीवासी समाजातील होती आणि तिचा जातीवाचक टिप्पण्णी करुन छळ करत असल्याचा आरोप इतर तीन डॉक्टरांवर आहे. पायल तडवीच्या आत्महत्येनंतर रुग्णालयातील डॉ. भक्ती मेहरे, डॉ. हेमा आहुजा आणि डॉ. अंकिता खंडेलवाल यांच्याविरोधात पोलिसांनी अॅन्टी रॅगिंग अॅक्ट तसेच अॅट्रॉसिटी कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. पायलच्या आत्महत्येनंतर प्रथामिक चौकशीनंतर रुग्णालयाने  या तिन्ही डॉक्टरांना निलंबित केलं होतं. या घटनेनंतर या तिन्ही आरोपी फरार झाल्या होत्या.

मंगळवारी पहिली अटक

पायल तडवी आत्महत्या प्रकरणी मंगळवारी पोलिसांनी आरोपी डॉ. भक्ती मेहेरे हिला अटक केली. भक्ती मेहेर हिची चौकशी सुरु असतानाच पोलिसांनी रात्रीच्या सुमारास दुसरी महिला आरोपी डॉक्टर हेमा आहुजा हिला अटक केली. 

 

 

डॉ. भक्ती मेहेरे आणि डॉ. हेमा अहुजा यांना अटक केली होती मात्र, तिसरी आरोपी डॉक्टर अंकिता खंडेलवाल फरार होती. अखेर बुधवारी पहाटेच्या सुमारास अंकिता खंडेलवाल हिला सुद्धा अटक केली. तिन्ही आरोपी डॉक्टरांनाही आज न्यायालयात हजर केलं जाणार आहे.

पायलने आत्महत्या केली नसून तिची हत्या असल्याचा आरोप तिच्या नातेवाईकांनी केला आहे. आपल्या मुलीला न्याय मिळावा यासाठी पायलच्या नातेवाईकांनी आंदोलन करण्यास सुरुवात केली. यानंतर वैध्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी पायलच्या नातेवाईकांची भेट घेत चौकशी करुन कारवाई करण्याचे आदेश दिले. तसेच त्रिसदस्यीय समिती सुद्धा नेमण्यात आल्याचं महाजन यांनी सांगितलं.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरण, तिन्ही आरोपी डॉक्टर अटकेत Description: डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणी मुंबई पोलिसांनी तिसऱ्या आरोपी महिला डॉक्टरलाही अटक केली आहे. आग्रीपाडा पोलिसांनी तिसरी आरोपी डॉक्टर अंकिता खंडेलवाल हिला अटक केली आहे.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola
Recommended Articles