खोपोली : सहलीवरुन (picnic ) परतत असलेल्या विद्यार्थ्यांच्या (students) बसचा (bus) मुंबई पुणे एक्स्प्रेस हायवेवर (Mumbai Pune Express Highway) भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. या बसमध्ये मुंबईतील खासगी क्लासचे (Private class) विद्यार्थी ट्रीपला गेले होते. रविवारी संध्याकाळी पावणे आठ वाजण्याच्या सुमारास अपघात घडल्याची माहिती मिळाली आहे. सध्या शाळांच्या आणि खासगी क्लासच्या पिकनिक निघण्याचाच काळ आहे.अशा स्थितीत आता मुलांना सहलीला पाठवणं कितपत सुरक्षित आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. (picnic bus accident on Mumbai Pune Expressway;2 students died)
अधिक वाचा : शाई फेकवरून चित्रा वाघ संतापल्या, दिली आक्रमक प्रतिक्रिया
हाती आलेल्या माहितीनुसार, या बसमधून 48 विद्यार्थी प्रवास करत होते, त्यातील 15 ते 20 जण जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. या जखमी विध्यार्थ्यांना खोपोलीतील सरकारी व खासगी रुग्णालयात केले दाखल करण्यात आले आहे. तर काही जणांना कामोठे येथील MGM रुग्णालयात केले दाखल केले आहे.
अधिक वाचा : सुब्रमण्यम स्वामींनी नरेंद्र मोदींची रावणासोबत केली तुलना
मिळालेल्या माहितीनुसार, खोपोली येथील अपघातग्रस्त बस ही मुंबईतील चेंबूर येथून मावळ येथे गेली होती. वेट एन जॉय नावाच्या थीम पार्कमधून ही बस पुन्हा विद्यार्थ्यांना घेऊन माघारी परतत होती. त्यावेळी चालकाचं बसवरील नियंत्रण सुटून ही बस बोरघाटात उलटली. यात दोन विद्यार्थ्यांचा जीव गेला आहे. बसमधील विद्यार्थी हे मुंबईतील चेंबूर येथील एका खासगी क्लासेसचे 10 वीच्या वर्गातील 48 विद्यार्थी होते. त्यांच्याबरोबर 2 शिक्षक होते. जवळपास 20 विद्यार्थी यात जखमी झाले आहेत. पोलिसांनी आणि स्थानिक बचाव यंत्रणांनी अपघातग्रस्त बसमधून विद्यार्थ्यांना तातडीने बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले. तर या अपघातात दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. हितीका खन्ना वय 16 वर्ष आणि राजेश म्हात्रे वय 16 अशी या मृत विद्यार्थ्यांचे नावे आहेत.
अपघातात मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सहलीला निघालेल्या बसचा अपघात झाल्याची ही दुसरी घटना रविवारी घडली. त्याआधी परभणीतही एसटी बस आणि स्कूल बसची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात घडला होता.
अधिक वाचा : समृद्धी महामार्गावरून उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
श्रुती पाटील,मानसी बोलके,रुद्र भागवत, सिद्धी भोईर,मानसी नरवरे,यश गायकवाड, अर्जुन देसाई,आयुष पांचाळ,प्राची शिगवण, वेद पाटील, आश्लेषा पोळ, अर्चित सिंग, तनिष पटेल, राजगोपाल, ओंकार गवळी, आकांक्षा ठाकूर, मृणाल पाटील, चैतू, ठाकूर, चालक, अमीर शेख, वाहक.
परभणीमध्ये स्कूल बस आणि एसटी बसचा भीषण अपघात झाला. या अपघातात 20 जण जखमी झाले असून, 4 जणांची प्रकृती गंभीर आहे. त्यांना तातडीनं परभणी शहरात उपचारासाठी हलवण्यात आलंय. गंगाखेडच्या खंडाळी गावाजवळ हा अपघात झाला. संत जनाबाई विद्यालयाच्या चॅप्लिन इंग्लिश स्कूलची बस विद्यार्थी आणि पालकांना घेऊन चाकूरला वॉटर पार्क पाहण्यासाठी गेली होती.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.