'PMOसोबत वेगळ्या पद्धतीने व्यवहार केला जात आहे', अर्णबच्या WhatsApp चॅटमध्ये पीएमओचा उल्लेख का?

Arnab Goswami and ex-BARC chief WhatsApp chat: अर्णब गोस्वामी आणि BARCचे माजी सीईओ पार्थो दासगुप्ता यांचे व्हॉट्सअॅप चॅट समोर आले आहे. या चॅटमुळे विविध प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.

PMO mention in WhatsApp chats allegedly between Arnab Goswami and ex-BARC chief partho dasgupta
'PMOसोबत वेगळ्या पद्धतीने व्यवहार केला जात आहे', अर्णबच्या WhatsApp चॅटमध्ये पीएमओचा उल्लेख का?  |  फोटो सौजन्य: Times Now

मुंबई : टीआरपी घोटाळा (TRP Scam) प्रकरणात आता नवीन खुलासा झाला आहे. या प्रकरणात रिपब्लिक टीव्हीचे एडिटर-इन-चीफ अर्णब गोस्वामी आणि ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च कौन्सिलचे माजी सीईओ पार्थो दासगुप्ता (Partho Dasgupta) यांच्यात झालेल्या व्हॉट्सअॅप चॅट समोर आले आहे. या चॅटमधून अनेक खुलासे झाले आहेत. या चॅटमधून टीआरपीसाठी गोष्टी कशा प्रकारे मॅनेज केल्या जात आहेत आणि कोणत्या प्रमाणात गोष्टी सुरू आहेत हे दिसून येत आहे. या चॅटवरुन असे बरेच खुलासे झाले आहेत ज्यावरुन असे दिसते की, अर्णबकडे सरकारशी संबंधित अधिक माहिती होती. देशाच्या सुरक्षिततेशी निगडित सुद्धा काही माहिती असल्याचं समोर आलं आहे.

अर्णब आणि पार्थो दासगुप्ता यांच्या व्हॉट्सअॅप चॅटमध्ये पंतप्रधान कार्यालयाचा (PMO)चा सुद्धा उल्लेख आहे ज्यामुळे विविध प्रश्न उपस्थित होत आहेत. यावरुन विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेत चौकशी करण्याची तसेच सरकारने उत्तर देण्याची मागणी केली आहे. या चॅटमधून समोर आले आहे की, BARCचे माजी सीईओ कथितपणे अर्णब गोस्वामी यांना विचारत आहेत की, "पीएमओवर काही प्रगती आहे का?" कथितपणे अर्णब केवळ सकारात्मक उत्तर देत नाहीयेत तर दावा करत आहेत की, पीएमओसोबत वेगळ्या पद्धतीने व्यवहार केला जात आहे.

टीआरपी घोटाळ्यासारख्या प्रकरणात पीएमओचे नाव कसे समोर येऊ शकते असा प्रश्न उपस्थित होत आहे. विरोधी पक्षाने यावरुन आक्रमक होत चौकशी करण्याची मागणी केली आहे. या चॅट प्रकरणावर एनडीए सरकारने कथित पीएमओ लिंकवर स्पष्टीकरण देण्याची मागणी विरोधकांनी केली आहे. या चॅटमध्ये अनेक ठिकाणी पीएमओचा उल्लेख आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी