पोलीस चौकशी सुरू असताना रडली शिल्पा शेट्टी

मुंबई
Updated Jul 24, 2021 | 18:30 IST

राज कुंद्राच्या पॉर्नोग्राफी केसमध्ये त्याची पत्नी बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिची मुंबई पोलिसांनी चौकशी केली. चौकशी सुरू असताना शिल्पा ३ ते ४ वेळा रडली.

थोडं पण कामाचं

 • पोलीस चौकशी सुरू असताना रडली शिल्पा शेट्टी
 • सहा तास शिल्पा शेट्टीची पोलीस चौकशी
 • पोलिसांनी शिल्पाचे म्हणणे (स्टेटमेंट) नोंदवून घेतले

मुंबईः मुंबई पोलिसांनी काल (शनिवार २३ जुलै २०२१) घरी येऊन केलेल्या चौकशी दरम्यान बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी अनेकवेळा रडली. शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा सध्या पॉर्न फिल्म निर्मिती प्रकरणी मुंबई पोलिसांच्या कोठडीत आहे. कोर्टाच्या आदेशानुसार राज कुंद्रा २७ जुलै पर्यंत पोलीस कोठडीत असेल. pornography case shilpa shetty cried several times during interrogation

पोलिसांनी राज कुंद्रा याच्यावर पॉर्न व्हिडीओ तयार करणे, पॉर्न व्हिडीओ विकणे, पॉर्न व्हिडीओ विकून मिळालेल्या पैशांतून बेटिंग अर्थात सट्टेबाजी करणे असे गंभीर आरोप केले आहेत. या प्रकरणात तपासाचा भाग म्हणून मुंबई पोलिसांच्या क्राइम ब्रँचच्या टीमने बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिची चौकशी केली. पोलीस राज कुंद्राला घरी घेऊन गेले. शिल्पा आणि राज यांची समोरासमोर तसेच शिल्पाची स्वतंत्रपणेही चौकशी झाल्याचे समजते. तब्बल सहा तास शिल्पा शेट्टीची पोलीस चौकशी झाली. पोलिसांनी शिल्पाचे म्हणणे (स्टेटमेंट) नोंदवून घेतले. 

पोलिसांशी बोलत असताना तीन ते चार वेळा शिल्पा शेट्टीला रडू कोसळले. शिल्पाला राज कुंद्राच्या पॉर्न व्हिडीओंच्या व्यवसायाची किती माहिती आहे हे जाणून घेण्यासाठी पोलिसांनी उलटसुलट प्रश्नांचा मारा केला. पोलिसांना माहिती देताना राजच्या कृत्याविषयी कळल्याने मोठा मानसिक धक्का बसल्याचे शिल्पाने सांगितले.

पतीच्या कृत्यामुळे माझ्या हातून काही महत्त्वाचे प्रोजेक्ट गेले. माझ्या समाजातील प्रतिमेला धक्का लागला; असे शिल्पाने पोलिसांना सांगितले.

मुंबई पोलिसांनी शिल्पा शेट्टीला वारंवार विचारलेले निवडक प्रश्न

 1. हॉटशॉट्स या अॅपविषयी माहिती आहे का, हे अॅप कोण चालवते?
 2. हॉटशॉट्स या अॅपच्या व्हिडीओ कंटेटविषयी आपल्याला काय माहिती आहे?
 3. हॉटशॉट्स या अॅपशी संबंधित काम आपण केले आहे का?
 4. राज कुंद्राचा मेव्हणा प्रदीप बक्षी याच्याशी हॉटशॉट्स या अॅप संदर्भात आपली कधी चर्चा झाली आहे का?
 5. वियान कंपनीमध्ये मोठा मालकी हक्क असूनही आपण त्या कंपनीच्या कामकाजातून २०२० पासून बाहेर पडण्याचा निर्णय का घेतला?
 6. वियान आणि कॅमरिन यांच्यातील आर्थिक व्यवहारांची माहिती आहे का?
 7. पॉर्न व्हिडीओ लंडनला पाठवणे अथवा अपलोड करण्यासाठी पाठवणे या कामांसाठी मुंबईच्या वियान कंपनीच्या ऑफिसचा वापर केला जात होता, याविषयी आपल्याला माहिती होते का?
 8. राज कुंद्रा यांच्या सर्व आर्थिक व्यवहारांची माहिती आहे का?

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी