"केंद्राकडून खऱ्या अर्थाने चौकशी झाली तर फटाक्यांची माळ लागेल" : राज ठाकरे

मुंबई
सुनिल देसले
Updated Mar 21, 2021 | 15:03 IST

MNS Chief Raj Thackeray Press Conference on Param Bir Singh letter: परमबीर सिंग यांनी लिहिलेल्या खळबळजनक पत्रानंतर राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत अनिल देशमुख यांच्या चौकशीची मागणी केली आहे.

MNS Chief Raj Thackeray
मनसे अध्यक्ष राज ठाकरे  |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

 • पोलीस आयुक्तांनी गृहमंत्र्यांवर अशा प्रकारे आरोप करण्याची देशाच्या इतिहासातील पहिली घटना - राज ठाकरे
 • अनिल देशमुखांचा राजीनामा घेऊन कसून चौकशी केली पाहिजे - राज ठाकरे

मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहून गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. या आरोपांनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्विट करत अनिल देशमुख यांनी तात्काळ राजीनामा देण्याची मागणी केली होती. त्यानंतर आता राज ठाकरेंनी पत्रकार परिषद घेत सविस्तर भाष्य केलं आहे.

केंद्र सरकारने या प्रकरणात हस्तक्षेप करावा

माझी केंद्र सरकारला विनंती आहे की त्यांनी ह्या प्रकरणाची सखोल चौकशी करायला हवी कारण या प्रकरणाचा राज्यात निष्पक्ष तपास होईल याची मला अजिबात खात्री नाही. जर केंद्राने पण नीट चौकशी नाही केली तर मात्र जनतेचा विश्वास कायमचा उडेल आणि आपण अराजकाच्या दिशेने जाऊ असंही राज ठाकरेंनी म्हटलं आहे.

पोलिसांना हे कृत्य करायला लावणारे कोण?

सरकार बरखास्त करा, राष्ट्रपती राजवट लागू करा हे राजकीय मुद्दे आहेत. यात आत्ता नको पडूया. याची चौकशी व्यवस्थित होऊ द्या. कारण चौकशी व्यवस्थित झाली नाही तर उद्या प्रत्येकाच्या घराबाहेर अशा गाड्या उभ्या राहतील. पोलिसांना हे कृत्य करायला लावणारे कोण हे आधी कळू द्या.

गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा आणि त्यांची चौकशी व्हायला हवी

जगातील सर्वोत्तम पोलीस दल म्हणून मुंबई पोलीस दल ओळखलं जातं, त्या पोलीस दलाला बॉम्बची गाडी एका उद्योगपतीच्या घराबाहेर ठेवायला सांगणं हे भयंकर आहे. याची जबाबदारी गृहमंत्र्यांनी घेऊन राजीनामा द्यायला हवा आणि त्यांची चौकशी व्हायलाच हवी.

राज ठाकरेंच्या पत्रकार परिषदेतील महत्वाचे मुद्दे

 1. पोलीस आयुक्तांनी गृहमंत्र्यांवर अशा प्रकारे आरोप करण्याची देशाच्या इतिहासातील पहिली घटना 
 2. ही घटना लज्जास्पद आहे
 3. गृहमंत्र्यांनी मुंबईप्रमाणेच इतर पोलीस आयुक्तांकडे किती मागणी केली हे बाहेर आलं पाहिजे 
 4. अनिल देशमुखांचा राजीनामा घेऊन कसून चौकशी केली पाहिजे
 5. परमबीर सिंग यांना पदावरुन का हटवण्यात आलं? याचं उत्त रअद्याप सरकारने दिलेलं नाही
 6. अंबानींच्या घराबाहेर ठेवलेले जिलेटिन आले कुठून? 
 7. शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी वाझेंना कोण घेऊन गेलं?
 8. उद्धव ठाकरे आणि मुकेश अंबानी यांचे जिव्हाळ्याचे संबंध
 9. कुणाच्यातरी आदेशाविना पोलीस असं करु शकतील का?
 10. योग्य चौकशी झाली तर फटाक्यांची माळ लागेल
 11. स्फोटकांनी भरेलली गाडी कोणाच्या आदेशावरुन ठेवण्यात आली याच्या तपासात केंद्र सरकारने हस्तक्षेप करावा
 12. अंबानींकडून पैसे खाढण्यासाठी कट रचण्यात आला ही थेअरी चुकीची 
 13. ह्या प्रकरणाची केंद्राने चौकशी करायला हवी कारण जशी चौकशी पुढे जाईल तशा फटाक्यांची माळ लागेल आणि अनेक धक्कादायक नावं बाहेर येतील
 14. जगातील सर्वोत्तम पोलीस दल म्हणून मुंबई पोलीस दल ओळखलं जातं, त्या पोलीस दलाला बॉम्बची गाडी एका उद्योगपतीच्या घराबाहेर ठेवायला सांगणं हे भयंकर आहे. याची जबाबदारी गृहमंत्र्यांनी घेऊन राजीनामा द्यायला हवा आणि त्यांची चौकशी व्हायलाच हवी.
 15. माझी माध्यमांना विनंती आहे की त्यांनी हा विषय गंभीर आहे ह्याची जाणीव ठेवून तो विषय भरकटू देऊ नये आणि हा प्रकार कोणाच्या सांगण्यावरुन केला याच्या मागे लागावं.
 16. माझी केंद्र सरकारला विनंती आहे की त्यांनी ह्या प्रकरणाची सखोल चौकशी करायला हवी कारण या प्रकरणाचा राज्यात निष्पक्ष तपास होईल याची मला अजिबात खात्री नाही. जर केंद्राने पण नीट चौकशी नाही केली तर मात्र जनतेचा विश्वास कायमचा उडेल आणि आपण अराजकाच्या दिशेने जाऊ
 17. सरकार बरखास्त करा, राष्ट्रपती राजवट लागू करा हे राजकीय मुद्दे आहेत. यात आत्ता नको पडूया. याची चौकशी व्यवस्थित होऊ द्या. कारण चौकशी व्यवस्थित झाली नाही तर उद्या प्रत्येकाच्या घराबाहेर अशा गाड्या उभ्या राहतील. पोलिसांना हे कृत्य करायला लावणारे कोण हे आधी कळू द्या.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी