राज ठाकरेंना राजकारणात यश मिळत नाही त्यामुळे ते अशी भूमिका घेतात - रामदास आठवले  

मुंबई
Updated Apr 19, 2022 | 16:18 IST

राज ठाकरे यांनी उलट सुलट बोलणं बंद केलं पाहिजे. सुरक्षे बाबत केंद्र सरकार निर्णय घेईल, अस मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज नागपूरमध्ये पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले

थोडं पण कामाचं
  • राज ठाकरेंच्या भूमिकेशी भाजप सहमत नाही - आठवले
  • मोदींची भूमिका सबका साथ सबका विकास
  • राज ठाकरेंच्या भूमिकेशी आरपीआय सहमत नाही - आठवले

नागपूर : एका धर्माने दुसऱ्या धर्माचा अपमान करू नये.  मशिदी वरील भोंगे हटविण्याच्या  राज ठाकरे यांच्या भूमिकेवर रामदास आठवले यांचा विरोध आहे. राज ठाकरे यांना सुरक्षा देण्याची गरज नाहीये. राज ठाकरे यांनी उलट सुलट बोलणं बंद केलं पाहिजे. सुरक्षे बाबत केंद्र सरकार निर्णय घेईल, अस मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज नागपूरमध्ये पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.  (Ramdas Athavale criticizes Raj Thackeray's stand)

राज ठाकरे यांच्या आतापर्यंतच्या राजकारणाला यश मिळत नाही, त्यामुळे ते उलटसुलट भूमिका घेत आहेत.  धर्मा धर्मामध्ये तेढ निर्माण करून भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाच्या विरूद्ध भूमिका घेण्याचे काम राज ठाकरे करत आहेत, असेही आठवले म्हणाले. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी