[VIDEO]: विधानसभा निवडणूक: नाराज रामदास आठवलेंनी केलं 'असं' ट्विट

मुंबई
Updated Oct 05, 2019 | 22:06 IST

विधानसभा निवडणूक २०१९: विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना-भाजप आणि मित्रपक्षांची महायुती एकत्र निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. मात्र, मित्रपक्षांना हव्या तितक्या जागा न मिळाल्याने नाराज असल्याचं दिसत आहे. 

ramdas athawale tweet vidhansabha election 2019 rpi shivsena bjp alliance mahayuti
रामदास आठवले (फाईल फोटो)  |  फोटो सौजन्य: Twitter

थोडं पण कामाचं

  • विधानसभा निवडणुकीपूर्वी रामदास आठवले नाराज
  • नाराज रामदास आठवलेंनी केलं ट्विट 
  • ट्विट करत रामदास आठवलेंनी व्यक्त केली नाराजी

मुंबई: विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. शिवसेना-भाजप-मित्रपक्षांची महायुती एकत्र निवडणूक लढवत आहे तर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. भलेही महायुतीमधील जागावाटप पूर्ण झालं असून उमेदवारांनी आपले अर्ज भरले असतील पण महायुतीमधील मित्रपक्ष असलेल्या आरपीआयची नाराजी आता समोर आली आहे.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आरपीआय)चे रामदास आठवले हे जागावाटपावरुन खूष नसल्याचं दिसत आहे. जागा वाटपात आपल्याला हव्या तितक्या जागा न मिळाल्याने रामदास आठवले हे नाराज असून त्यांनी यासंदर्भात एक ट्विटही केलं आहे. रामदास आठवलेंनी ट्विट करत म्हटलं, "भाजप-शिवसेना आरपीआय महायुतीमधील जागावाटपावरुन आरपीआय असमाधानी आहे. मात्र, आंबेडकरी समाजाला सत्तेत भागीदार ठेवण्यासाठी आरपीआय महायुतीला नक्कीच समर्थन देईल".

महायुतीचं जागावाटप पूर्ण झालं आहे. महायुतीमध्ये शिवसेनेच्या वाट्याला १२४ जागा आल्या आहेत तर भाजपच्या वाट्याला १६४ जागा आहेत. आपल्या १६४ जागांपैकी भारतीय जनता पक्षाने महायुतीमधील मित्रपक्षांना १४ जागा दिल्या आहेत. मात्र, त्यापैकीही बहुतांश जागा मित्रपक्ष हे आपल्याच चिन्हावर लढणार असल्याचंही भाजपने जाहीर केलं आहे.

आरपीआयने उमेदवार केले जाहीर

महायुतीमधील घटकपक्ष असलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आरपीआय) ने आपल्या पक्षाच्या सहा उमेदवारांची यादी जाहीर करत त्यांना उमेदवारी दिली आहे. या सहा जागांमध्ये माळशिरस, फलटण, पाथरी, नायगाव, भंडारा, मानखुर्द शिवाजीनगर या मतदारसंघांचा समावेश आहे.

  1. माळशिरस - डॉ. विवेक गुजर
  2. फलटण - दिगंबर आगाव 
  3. पाथरी - मोहन फड
  4. नायगाव - राजेश पवार
  5. भंडारा - अरविंद भालाधरे
  6. मानखुर्द शिवाजीनगर - गौतम सोनवणे 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...