रियाची कबुली, अंमली पदार्थ खरेदी केले

Rhea Chakraborty admits to Narcotics Control Bureau she was procuring drugs अंमली पदार्थ खरेदी केले पण स्वतः त्यांचे सेवन केले नाही, अशी कबुली रिया चक्रवर्तीने NCBला दिल्याचे समजते.

Rhea Chakraborty admits to Narcotics Control Bureau she was procuring drugs
रियाची कबुली, अंमली पदार्थ खरेदी केले 

थोडं पण कामाचं

  • रियाची कबुली, अंमली पदार्थ खरेदी केले
  • सूत्रांनी दिली माहिती
  • रियाची सोमवारी पुन्हा होणार चौकशी

मुंबईः अंमली पदार्थ (drugs) खरेदी केले पण स्वतः त्यांचे सेवन केले नाही, अशी कबुली रिया चक्रवर्ती (Rhea Chakraborty) हिने नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोला (Narcotics Control Bureau - NCB) दिल्याचे समजते (Rhea Chakraborty admits to Narcotics Control Bureau she was procuring drugs). एनसीबीने रियाला आणखी चौकशी करण्यासाठी सोमवारी पुन्हा बोलावले आहे.

रियाला रविवारी सकाळी एनसीबीने बोलावले होते. रिया १२ वाजता एनसीबीच्या ऑफिसमध्ये पोहोचली. तिची सलग सहा तास चौकशी करण्यात आली. या चौकशीनंतर रियाला घरी जाण्याची परवानगी देण्यात आली.

एनसीबीच्या चौकशीला उपस्थित राहण्याआधी रियाने कायदेशीर सल्ला घेतला होता. याच कारणामुळे तिने अंमली पदार्थ खरेदी केल्याची कबुली दिली पण सेवन केले नसल्याचे सांगितल्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली. एनसीबीने रियाच्या घरी छापा मारला होता. या छाप्यात अंमली पदार्थ जप्त झाले नव्हते. सुशांतच्या मृत्यूनंतर दोन महिन्यांपेक्षा जास्त काळ झाल्यानंतर एनसीबीने तपास सुरू केला आहे. अशा परिस्थितीत अंमली पदार्थ खरेदी केल्याची कबुली दिली तरी हा मुद्दा सिद्ध करणे एनसीबीसाठी आव्हानात्मक आहे, असे तज्ज्ञांचे मत आहे.

रियाने रक्त तपासणी करुन घेण्याची तयारी दाखवली आहे. दोन महिन्यांपेक्षा जास्त काळ अंमली पदार्थांचे सेवन केले नसल्यास रक्ताच्या तपासणीत काही आढळणे कठीण आहे. रक्त तपासणीचा अहवाल सुटका करुन घेण्यासाठी वापरणे शक्य आहे. ही बाब लक्षात घेऊन रिया बोलत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

एनसीबीने मोबाइल चॅटच्या आधारे रियाला प्रश्न केले. चॅट बाबत रियाने उलटसुलट उत्तरं दिली. वेगवेगळी उत्तरं देऊन एनसीबीच्या तपासाची दिशा भरकटावी यासाठी तिने प्रयत्न केला. याआधी शौविक चक्रवर्ती, सॅम्युअल मिरांडा आणि दीपेश सावंत या तिघांनी रियासाठी अंमली पदार्थ खरेदी केल्याची कबुली दिली. 

रियाकडून पुरेशी माहिती मिळाली नसल्यामुळे तिला सोमवारी पुन्हा चौकशीसाठी बोलावल्याचे एनसीबीने सांगितले. अंमली पदार्थ प्रकरणी आतापर्यंत दीपेश सावंत (Dipesh Sawant), शौविक चक्रवर्ती (Showik Chakraborty), सॅम्युअल मिरांडासह (Samuel Miranda) सातजणांना अटक झाली आहे. यापैकी दीपेश, शौविक, सॅम्युअल, जैद यांची समोरासमोर बसवून चौकशी सुरू आहे. एनसीबी सोमवारी रियाची अटकेतील आरोपींसमोर बसवून चौकशी करणार असल्याचे वृत्त आहे. 

आरोपी आणि संशयितांपैकी किती जण सेलिब्रेटींना अंमली पदार्थ पुरवत होते त्याचा तपास होणार आहे. पुढील दोन दिवसांत या प्रकरणात आणखी धरपकड होऊ शकते, असे संकेत एनसीबीने दिले. या निमित्ताने बॉलिवूडमधील (Bollywood) अंमली पदार्थांच्या व्यवहारांशी संबंधित नवी माहिती उजेडात येण्याची शक्यता आहे.

मुंबईत अभिनेता सुशांत याच्या घरात पार्ट्यांचे आयोजन व्हायचे अशी चर्चा आहे. या प्रकरणी तपास सुरू असल्यामुळे तपास पथकाने जास्त माहिती दिलेली नाही. पण पार्ट्यांचा आरोप खरा ठरला तर त्याचा संबंध सुशांतच्या मृत्यूशी आहे का हे तपासले जाणार आहे.

सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) याचा मृतदेह त्याच्या वांद्रे येथील घरात बेडरूमध्ये १४ जून रोजी सकाळी आढळला होता. सुशांतने गळफास लावून आत्महत्या केल्याचे त्याचा फ्लॅटमेट सिद्धार्थ पीठानी आणि सुशांतच्या नोकरांनी सांगितले. पोलीस येण्याआधीच आपण सुशांतचा फासाला लटकलेला मृतेदह उतरवून बेडवर ठेवल्याची माहिती सिद्धार्थने दिली. या प्रकरणात सुशांतच्या नातलगांनी पोलीस तक्रार केली. सुशांतच्या आत्महत्येसाठी कारणीभूत ठरल्याचा ठपका सुशांतची मैत्रीण रिया चक्रवर्ती तसेच तिच्या कुटुंबातील सदस्यांसह अन्य काही जणांवर ठेवला. या प्रकरणाचा तपास सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सीबीआयने सुरू केला. सुशांतच्या मृत्यूचे रहस्य उलगडण्यासाठी सीबीआय (Central Bureau of Investigation - CBI), सुशांतच्या पैशांचा गैरवापर झाला का याचा तपास करण्यासाठी इडी (Enforcement Directorate - ED) आणि सुशांत प्रकरणात अंमली पदार्थांचा वापर झाला का याचा तपास करण्यासाठी एनसीबी चौकशी करत आहे. 

आतापर्यंत अटक केलेल्या सर्व आरोपींविरोधात एनडीपीएस कायद्यांतर्गत (Narcotic Drugs and Psychotropic Substances Act - NDPS ACT) आरोप ठेवण्यात आले आहेत. दोषी आढळल्यास या आरोपींना दीर्घ कालावधीसाठी जेलमध्ये जावे लागेल. आरोपींवर अंमली पदार्थ हाताळणे, अंमली पदार्थांची खरेदी-विक्री, अंमली पदार्थांचे सेवन अशा स्वरुपाचे गंभीर आरोप आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी