Sanjay Raut | औरंगजेबाच्या कबरीत तुम्हांला कधी तरी जावे लागेल : संजय राऊत 

मुंबई
Updated May 13, 2022 | 14:10 IST

औरंगजेबाचा कबरी पुढे तुम्ही आज नमाज पडत आहात, त्या औरंगजेबाला कबरीमध्ये मराठ्यांनी टाकले आहे, कधीतरी तुम्हाला देखील त्याच कबरी मध्ये जावे लागेल,अशी घणाघाती टीका शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे. 

थोडं पण कामाचं
  • वारंवार संभाजीनगर येथे यायचे आणि औरंगजेबाच्या कबरीपुढे महाराष्ट्राला खिजवण्यासाठी गुडघे टेकावायचे,
  • अशातून महाराष्ट्रामध्ये अशांतता निर्माण करायची असे काहीतरी ओवेसी बंधू यांना करायचे आहे,
  • औरंगजेबाला कबरीमध्ये मराठ्यांनी टाकले आहे, कधीतरी तुम्हाला देखील त्याच कबरी मध्ये जावे लागेल,

मुंबई :  वारंवार संभाजीनगर येथे यायचे आणि औरंगजेबाच्या कबरीपुढे महाराष्ट्राला खिजवण्यासाठी गुडघे टेकावायचे, अशातून महाराष्ट्रामध्ये अशांतता निर्माण करायची असे काहीतरी ओवेसी बंधू यांना करायचे आहे, पण मी आज इतकेच सांगेन की ज्या औरंगजेबाचा कबरी पुढे तुम्ही आज नमाज पडत आहात, त्या औरंगजेबाला कबरीमध्ये मराठ्यांनी टाकले आहे, कधीतरी तुम्हाला देखील त्याच कबरी मध्ये जावे लागेल,अशी घणाघाती टीका शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे. 

काल एमआयएमचे तेलंगणाचे आमदार अकबरुद्दीन ओवैसी यांनी औरंगाबाद येथे येऊन औरंगजेबाच्या कबरीचे दर्शन घेतले. यावर संजय राऊत यांनी टीका केली आहे. आज ते पत्रकारांशी बोलत होते. 

सातत्याने काश्मिरी पंडितांच्या हत्या पुन्हा सुरू झालेले आहेत, काल तरुण काश्मिरी पंडितांची हत्या त्याच्याच कार्यालयात करण्यात आली, काश्मीरचा वातावरण  पुन्हा एकदा बिघडवण्याचा प्रयत्न जो सुरू झाला आहे, हे पंतप्रधान आणि गृहमंत्री यांनी अत्यंत गांभीर्याने घेतले पाहिजे, काही काळ निवडणुकांचे राजकारण दूर ठेवले पाहिजे असे संजय राऊत म्हणाले. 

कश्मीरी पंडितांची घरवापसी आणि त्यांची सुरक्षा हा भारतीय जनता पक्षाचा मुख्य अजेंडा होता, त्यासाठी 370 कलम हटवण्यात आले, कश्मीरचे विभाजन करण्यात आले, त्यासाठी आम्ही सर्वांनी त्यांना पाठिंबा दिला, तरीही कश्मिरी पंडित यांची घरवापसी होऊ शकली नाही, काश्मीर आजही अशांत आहे, फक्त बातम्या बाहेर येत नाहीत, फक्त कश्मीरी पंडित नाही तर तिथल्या सामान्य लोकांचे जीवन देखील असुरक्षित आहे, असे वारंवार सांगितले जात आहे, असा हल्लाबोल राऊत यांनी केंद्र सरकारवर केला आहे. 

लाऊड स्पीकर, हनुमान चालीसा असे मुद्दे घेऊन कश्मीर सारख्या विषयावरून लोकांचे मन तुम्ही विचलित करू शकत नाही, लोकांचे अत्यंत बारीक लक्ष या विषयाकडे आहे, शिवसेना कश्मीरी पंडित यांच्या मुद्द्याकडे अत्यंत संवेदनशीलपणे पाहत आहे, एका बाजूला चीन घुसले आहे तर दुसर्‍या बाजूला कश्मीर अशांत आहे हे देशाला परवडणारे नाही, असेही 

शरद पवार यांच्या बद्दल बोलण्यासाठी त्यांच्या पक्षातले अनेक नेते समर्थ आहेत, पण महा विकास आघाडी मधील नेत्यांनी तोलून-मापून बोलले पाहिजे, महाविकास आघाडीच्या एकतेला तडा जाईल असे कोणी बोलू नये, असा सल्लाही संजय राऊत यांनी दिला आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी