Sanjay Raut: मुंबई: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत यांची पत्रा चाळ प्रकरणातील अटक बेकायदेशीर ठरवत पीएमएलए कोर्टाने त्यांना जामीन मंजूर केला. त्यामुळे तुरुंगातून सुटल्यानंतर संजय राऊत हे पुन्हा आक्रमकपणे विरोधकांना अंगावर घेतील असा सगळ्यांचा कयास होता. खरं तर तुरुंगातून बाहेर येताच संजय राऊत यांनी तसं जोरदार भाषणही केलं. मात्र, अगदी दुसऱ्याच दिवशी राऊतांनी मैत्रीची आणि कटुता मिटवण्याचा भाषा केली. ज्यामुळे सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या. (sanjay raut praised devendra fadnavis as soon as he came out of jail what is in rauts mind)
संजय राऊत आर्थर रोड जेलच्या बाहेर आल्यानंतर शिवसेनेने जोरदार शक्तीप्रदर्शन केलं होतं. परंतु दुसऱ्याच दिवशी मात्र राऊतांनी फडणवीसांचं चक्क कौतुक केलं. 'राज्याचे उपमुख्यमंत्रीच सगळं सरकार चालवत आहेत, त्यांनी चांगले निर्णय घेतले आहेत. त्याची लवकरच भेट घेणार.' असं राऊत म्हणाले.
'राज्याचं नेतृत्व फडणवीसच करत आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील राजकारणात असलेल्या कडूपणा मिटावा', असंही राऊत म्हणाले. ज्या भाजपविरोधात संजय राऊत यांनी तुरुंगात जाण्याआधी रान उठवलं होतं त्याच राऊतांचा सूर नेमका का बदलला? अशी चर्चा आता सर्वत्र सुरु आहे.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.