meow meow : आदित्य ठाकरेंना बघून नितेश राणेंनी केलं 'म्याव म्याव'

मुंबई
Updated Dec 23, 2021 | 16:29 IST

Seeing Aditya Thackeray, MLA Nitesh Rane did 'meow meow' : आज (गुरुवार २३ डिसेंबर २०२१) सभागृहाबाहेर आमदार नितेश राणे यांनी मांजरीप्रमाणे म्याव म्याव आवाज काढला. सभागृहाबाहेर नितेश राणेंनी ही कृती आदित्य ठाकरे यांना बघून केली.

थोडं पण कामाचं
  • आदित्य ठाकरेंना बघून नितेश राणेंनी केलं 'म्याव म्याव'
  • अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी घडली घटना
  • सभागृहाबाहेर घडली घटना

Seeing Aditya Thackeray, MLA Nitesh Rane did 'meow meow' : मुंबई : हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सभागृहात आमदार भास्कर जाधव यांनी पंतप्रधानांची नक्कल केली. हे प्रकरण तापले आणि आमदार भास्कर जाधव यांनी बिनशर्त माफी मागितली. यानंतर आज (गुरुवार २३ डिसेंबर २०२१) सभागृहाबाहेर आमदार नितेश राणे यांनी मांजरीप्रमाणे म्याव म्याव आवाज काढला. सभागृहाबाहेर नितेश राणेंनी ही कृती आदित्य ठाकरे यांना बघून केली. 

अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी कामकाज सुरू होण्याआधी विरोधक विधानसभेच्या दिशेने जाणाऱ्या पायऱ्यांवर बसले होते. सरकार विरोधात घोषणाबाजी करत आणि बॅनर झळकवत विरोधकांनी पायऱ्यांवर बसून आंदोलन सुरू केले. याच सुमारास महाराष्ट्राचे पर्यावरण आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे तिथे आले. ते पायऱ्यांवरुन विधानसभेच्या दिशेने जात होते त्यावेळी नितेश राणेंनी म्याव म्याव असा आवाज काढला. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. 

आमदार नितेश राणे अनेकदा शिवसेना आणि शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांवर टीका करत असतात. अनेकदा त्यांनी टीका करण्यासाठी ट्विटर, फेसबुक या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर केला आहे. याआधी सुशांत सिंह राजपूतची एक्स सेक्रेटरी दिशा सालियन हिच्या मृत्यू प्रकरणी नितेश राणेंनी थेट आदित्य ठाकरेंना लक्ष्य केले होते. मुंबई पोलीस दिशा सालियन प्रकरणात आदित्य ठाकरेंना चौकशीसाठी बोलावणार आहेत का?, कायदा सर्वांसाठी समान असतो; अशा स्वरुपाची वक्तव्य नितेश राणेंनी केली होती.

आमदार भास्कर जाधव यांनी सभागृहात कामकाजावेळी पंतप्रधानांची नक्कल केली आणि प्रकरण तापल्यावर बिनशर्त माफी मागितली. या घटनेवर मतप्रदर्शन करताना नितेश राणेंनी भास्कर जाधव यांना सोंगाड्या म्हटले होते. या घटनेच्या दुसऱ्या दिवशी नितेश राणेंनी सभागृहाबाहेर कोणाचेही नाव न घेता फक्त आदित्य ठाकरेंकडे बघून म्याव म्याव असा आवाज काढला. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी