मुंबई : हिंदुह्रदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Shiv Sena Chief Balasaheb Thackeray) यांची आज जयंती आहे. त्यांच्या या जयंती निमित्त सर्वपक्षीय नेत्यांकडून त्यांना आदरांजली वाहण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनीही ट्विट करुन बाळासाहेबांना आदरांजली वाहिली आहे. आपल्या ट्विटमध्ये त्यांनी लिहिलं, "बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त अभिवादन. बाळासाहेबांनी आपली मूल्य जपण्यासाठी कधीही तडजोड केलेली नाही. लोकांच्या हितासाठी त्यांनी अहोरात्र काम केलं."
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी एक व्हिडिओ ट्विट करुन त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. मात्र, त्याचेवेळी देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला चांगलेच चिमटे काढल्याचं पहायला मिळत आहे.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणाला एक वेगळी दिशा दिली. त्यावेळी काँग्रेसला राज्यातून हद्दपार करु ही एक चळवळ होती आणि त्याचं नेत्रृत्व बाळासाहेबांनी केलं. हिंदुत्वाची जी लाट निर्माण केली त्याचं श्रेय बाळासाहेबांना द्यावे लागेल. त्यावेळी अटल बिहारी वाजपेयी यांच्यासारखे नेते त्यांच्यासोबत होते. मराठी माणसाला बाळासाहेबांनी गर्वाने बोलायला शिकवलं की मी मराठी आहे. मराठी माणसाला लढण्यासाठी बाळासाहेबांनी लढण्याचं बळ आणि प्रेरणा दिली. बाळासाहेबांनी मराठी आणि महाराष्ट्रासाठी अनेक घाव झेलले. बाळासाहेबांच स्मरण होत नाही असा एकही दिवस जात नाही. कारण बाळासाहेब ठाकरे होते म्हणून आज आम्ही आहोत.
हिंदुह्रदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा भव्य पूर्णाकृती पुतळा मुंबईतील कुलाबा परिसरातील श्यामप्रसाद मुखर्जी चौकात उभारण्यात येत आहे. या पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, पर्यटन-पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री बाळासाहेब ठाकरे उपस्थित राहणार आहेत.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा हा पुतळा ९ फूट उंचीचा असून बाराशे किलो ब्रॉँझपासून तयार करणअयात आलेला आहे. हा पुतळा दोन फूट उंच हिरवळीसह १४ फूट उंच चौथऱ्यावर बसवण्यात आला आहे. प्रबोधन प्रकाशनाच्यावतीने या पुतळ्याची उभारणी करण्यात आळी आहे. ज्येष्ठ शिल्पकार शशिकांत वडके यांनी हा पुतळा साकार केला आहे.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.