VIDEO: शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या पुतळ्याचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण

मुंबई
Updated Jan 23, 2021 | 19:20 IST

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती आहे. या जयंतीच्या दिवशी बाळासाहेब ठाकरे यांच्या मुंबईतील भव्य पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. हा पुतळा ९ फुटांचा असून पूर्णाकृती आहे.

थोडं पण कामाचं

  • हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या भव्य पुतळ्याचे अनावरण
  • मुंबईतील कुलाबा परिसरात बाळासाहेबांच्या भव्य पुतळ्याचे अनावरण
  • कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पुतळ्याचे अनावरण

मुंबई : हिंदुह्रदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Shiv Sena Chief Balasaheb Thackeray) यांची आज जयंती आहे. या दिवशी मुंबईत बाळासाहेब ठाकरे यांच्या भव्य पुतळ्याचे (Balasaheb Thackeray statue) अनावरण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या हस्ते करण्यात करण्यात आले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना हा पुतळा पूर्णाकृती असून तो ९ फुटांचा आहे. पुतळा साकारणारे शशिकांत वडके या पुतळा अनावरणाच्या वेळी भावूक झाल्याचं पहायला मिळालं.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया देत म्हटलं, सर्वपक्षीय नेते एकत्र आल्याचा आनंद झाला, सर्वपक्षीय नेत्यांचे आभार मानतो, माझ्या आयुष्यातील हा अविस्मरणीय क्षण आहे.

(फोटो सौजन्य: ShivSena Twitter)

या कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, मंत्री एकनाथ शिंदे, मंत्री सुभाष देसाई, मंत्री छगन भुजबळ, खासदार संजय राऊत, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, मुंबईचे मनपा आयुक्त इक्बालसिंह चहल यांच्यासह इतरही मान्यवर नेते उपस्थित होते.

पाहा VIDEO

असा आहे बाळासाहेबांचा पूर्णाकृती पुतळा

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा हा पुतळा ९ फूट उंचीचा असून बाराशे किलो ब्राँझपासून तयार करण्यात आलेला आहे. हा पुतळा दोन फूट उंच हिरवळीसह १४ फूट उंच चौथऱ्यावर बसवण्यात आला आहे. प्रबोधन प्रकाशनाच्यावतीने या पुतळ्याची उभारणी करण्यात आळी आहे. ज्येष्ठ शिल्पकार शशिकांत वडके यांनी हा पुतळा साकार केला आहे.

मुख्यमंत्र्यांचे बाळासाहेब ठाकरेंना जयंतीनिमित्त अभिवादन

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हिंदुह्रदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना जयंतीनिमित्त अभिवादन केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अभिवादन संदेशात म्हणतात, छत्रपती शिवाजी महाराज आणि भगवा यांनाच जीवन मानणारे हिंदुह्रदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे एक महान राष्ट्रभक्त आणि हिंदुत्वाचे तेजस्वी रूप होते. प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांच्याकडून त्यांनी पुरोगामित्व आणि सामान्य माणसाच्या व्यथांना आवाज देण्याची शिकवण घेतली. संयुक्त महाराष्ट्र चळवळ, सीमाप्रश्न या आंदोलनात बाळासाहेबांनी नेत्रृत्वाची परिसीमा गाठली. राज्याच्या नव्हे तर देशाच्या राजकीय आणि समाजकारणात चैतन्य फुलविणारे बाळासाहेब लेखक, पत्रकार, व्यंगचित्रकार, परखड वक्ते, मनस्वी कलाकार असे बहुआयामी होते. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी